'Sarathi' will not be closed, will provide Rs 8 crore: Ajit Pawar 
मुख्य बातम्या

‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार ः अजित पवार

मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरू केलेल्या ‘सारथी’ संस्थेचे काय होणार, असा सातत्याने प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नाला राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. सारथी बंद होणार नाही. सारथीला आठ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ९) केली आहे.

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरू केलेल्या ‘सारथी’ संस्थेचे काय होणार, असा सातत्याने प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नाला राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. सारथी बंद होणार नाही. सारथीला आठ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ९) केली आहे.

मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी ‘सारथी’ संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरुन ही संस्था अधिक चर्चेत आली. सारथी बंद होणार, सारथीकडे महाविकास आघाडीचे लक्ष नाही, अशी सातत्याने टीका होत होती. यावरुन राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता. तसेच आपण ओबीसी असल्याने मला टार्गेट करण्यात येत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते.

या वादानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी हस्तक्षेप करत बैठक बोलावली होती. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे भोसले, विजय वडेट्टीवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संस्थेच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी माहिती दिली.

‘‘सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये चुकीचा संदेश गेला होता. मात्र, आता तसे होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचे काम पारदर्शी व्हावे,’’ असे अजित पवार म्हणाले. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन खात्याच्या अख्यारित घेणार आहे. तसेच उद्याच सारथीला निधी दिला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

बैठकीनंतर संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाने गैरअर्थ घेऊ नये. काही निर्णय घ्यायचे होते म्हणून अजित पवार यांनी दालनात बैठक घेतली. पवारांनी शब्द दिला आहे, सारथीची स्वायत्तता टिकेल, त्याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली आहे.

वादावर पडदा दरम्यान, मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मंचाखाली बसवल्यावरुन वाद निर्माण झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT