विखे पाटील कृषी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय दळे
विखे पाटील कृषी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय दळे 
मुख्य बातम्या

विखे पाटील कृषी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय दळे

टीम अॅग्रोवन

नगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय दळे पाटील तर प्रदेश कार्याध्यक्षपदी भागवत देवसरकर यांची निवड करण्यात आली.  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीची नगर येथे बैठक झाली. त्या वेळी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रदेश सचिवपदी प्रा. विवेक सुकणे, प्रदेश उपाध्यक्षपदी गुणवंत आठरे पाटील, प्रदेश संघटकपदी चक्रधर पाटील देवसरकर, प्रदेश समन्वयपदी शंकर पवार निवेकर, कोषाध्यक्षपदी रावसाहेब घुमरे आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली. बैठकीमध्ये मागील तीन महिन्यांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांसाठी डॉ. स्वामिनाथन आयोग लागू करणे, एमआयडीसीमधील जमीन शेतकऱ्यांना लघुउद्योग व शेतीपूरक व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना केजी टू पीजीपर्यंत मोफत शिक्षण देणे अशा मागण्यांचे ठराव एकमुखी संमत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पुढील काळामध्ये शिर्डी येथे महाअधिवेशन, उदगीर (जि. लातूर) व उमरखेड (जि. यवतमाळ) येथे कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या माध्यमातून या पुढील काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी आंदोलने, जनजागृती कार्यक्रम, मेळावे ठेवण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. बैठकीला सचिन शिंदे, एकनाथराव मोरे, शेख रहीम, नानासाहेब गाडे, लक्ष्मणराव देवडे, राजेंद्र नळी, सुरेश तरकसे, रवींद्र गाडे, विठ्ठल गलबे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT