सांगली जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २० फेब्रुवारी रोजी
सांगली जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २० फेब्रुवारी रोजी 
मुख्य बातम्या

सांगली जिल्हा परिषदेचा २० फेब्रुवारीला अंदाजपत्रक

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात सन २०१८-१९ मध्ये वाढ झाली आहे. ते ९६ कोटी रुपयांवर पोचले आहे. या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरीसह २०१९-२० सालचे मूळ अंदाजपत्रक २० फेब्रवारी रोजी मांडले जाणार आहे. अर्थ सभापती अरुण राजमाने अर्थसंकल्प मांडतील. त्यात स्वीय निधीतून नव्या योजना काय असतील, याची उत्सुकता असणार आहे. 

सन २०१८-२०१९ चे मूळ अंदाजपत्रक ५९ कोटी ४७ लाखांचे होते. जिल्हा परिषदेकडून खर्चाच्या नियोजनासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेल्याने सुमारे ७० टक्के खर्च झाल्याचे सांगण्यात आले. यात महसुली आणि भांडवली खर्चाचा समावेश आहे. गत वर्षातील निधी शिल्लक राहिल्याने चालू वर्षीच्या स्वीय निधीत वाढ झाली. चालू अंदाजपत्रक ९६ कोटींवर गेल्याने नावीन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आला आहे.  जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वैयक्तिक योजनांसोबत सामूहिक योजनांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, वैयक्तिक योजनांचा निधी सर्वाधिक अखर्चित असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण, महिला बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभाग निधी खर्चात पिछाडीवर आहे. छोटे पाटबंधारे, आरोग्य विभागाचा बऱ्यापैकी खर्च झाला आहे. कृषी, ग्रामपंचायत, समाजकल्याण विभाग खर्चात पुढे आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होणार असल्याने जि. प. कडून बजेट मांडण्याची लगबग सुरू आहे. सन २०१९-२० मध्ये लोकाभिमुख योजना सुरू ठेवण्याचा नव्या पदाधिकाऱ्यांचा विचार आहे. त्याचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नवीन अंदाजपत्रकाबाबत उत्सुकता आहे.

जेवढा खर्च, तेवढा निधी  खर्चात जे विभाग मागे आहेत, त्यांना निधी खर्चाबाबत तातडीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. चालू आर्थिक वर्षात ज्या विभागाचा जेवढा निधी खर्च होईल, तेवढाच निधी पुढील वर्षात देण्यात येईल, असेही सभापती राजमाने यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT