समृध्दी महामार्ग
समृध्दी महामार्ग 
मुख्य बातम्या

पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम सुरू होण्याची शक्‍यता

टीम अॅग्रोवन
वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती महामार्गाचे काम पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा या दोन जिल्ह्यांत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची अधिग्रहणाची प्रक्रिया सुमारे ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पूर्ण झाली आहे. येत्या आठ दिवसांत (३१ मार्च) अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने प्रकल्पाचे काम तातडीने सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.  
 
विदर्भातील कृषी विकासाला चालना मिळावी, तसेच विदर्भातील शेतीमाल मुंबई बाजारपेठेपर्यंत जलदगतीने पोहचला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर- मुंबई कृषी समृद्धी जलदगती महामार्ग आखला आहे. वाशीम जिल्ह्यात ९७.२३ आणि बुलडाण्यात ८७.२९ किलोमीटर हा महामार्ग जाणार आहे. 
 
यासाठी पहिल्या टप्प्यांत ८९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीअंतर्गत लॅंड पुलिंग योजनेअंतर्गत वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील ७५ टक्के जमिनीची खरेदी प्रक्रिया पार पडली आहे. वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील गावे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पॅकेज दोन अंतर्गत येत असल्याने येथील खरेदी प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
 
त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यात अमरावतीपासून या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. शासनस्तरावरून यासाठी वेगाने खरेदी प्रक्रिया उरकण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

सुरवातीला वाशीम व बुलडाणा जिल्ह्यामध्ये लॅंड पुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध होता. ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे घेतलेल्या आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवला गेला.

या प्रस्तावाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. त्यामुळे मिळणाऱ्या मोबदल्यावर शेतकरी समाधानी असल्याने या महामार्गाचे काम सुरू होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे आता बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT