tuberose
tuberose  
मुख्य बातम्या

निशिगंधाच्या नवीन वाणाचे नामकरण ‘सह्याद्री वामन’

टीम अॅग्रोवन

पुणे ः पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या लहान दांडी असणाऱ्या आणि कुंड्यांसाठी उपयुक्त असलेल्या निशिगंधाच्या वाणाचे नामकरण ‘सह्याद्री वामन’ करण्यात आले आहे. संचालनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉ. ए. के. सिंह यांच्या ऑनलाइन उपस्थितीत वाणाचे लोकार्पण करण्यात आले.  संचालनालयाचा ११ वा वर्धापन दिन गुरुवारी (ता. १०) ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉ. ए. के. सिंह, पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद ‘आयसीएआर’चे फलोत्पादन विभागाचे सहायक उपनिरीक्षक डॉ. विक्रमादित्य पांडे डॉ. बी. के. पांडे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संचालनालयाचे डॉ. आर. जी. सोमकुंवर, कांदा लसूण संचालनालयाचे डॉ. मेजर सिंग, अटारीचे संचालक डॉ. लखन सिंग, बिकानेरच्या केंद्रीय शुष्क बागवानी संशोधन केंद्राचे डॉ. पी. एल. सरोज, तेलताड संशोधन संस्थेचे डॉ. आर. के. माथूर, राज्यातील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अनुक्रमे कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. डी. सावंत, पंजाबराव देशमुख मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. वि. एम. भाले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन यांच्यासह विविध संस्थांचे माजी संचालक, शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प-पुष्प अंतर्गतचे वैज्ञानिक उपस्थित होते.  या वेळी झालेल्या चर्चेमध्ये फुलांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, औद्योगिक आणि आर्थिक संधी याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.

फुल शेती ठरतेय पर्याय  फुलांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी वाढत असताना, नवनवीन वाण बाजारपेठेत आणण्यासाठी पुष्पसंशोधन संचालनालय प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळत असून, नवनवीन वाण शेतकऱ्यांना देखील पर्याय ठरत असून, फूल शेतीमध्ये संधी उपलब्ध होत आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी देखील फुलांची मागणी वाढत असताना, शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला फूल शेती पर्याय ठरत आहे, असे डाॅ. ए. के. सिंह यांनी सांगितले  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT