`Run Dahigaon Upsa Irrigation Scheme on solar energy 
मुख्य बातम्या

`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवा`

सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.

जलसंपदामंत्री पाटील यांनी नुकतेच टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. त्याच धर्तीवर दहिगाव उपसा सिंचन योजनाही राबवावी. यापूर्वीही तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून आपण ही मागणी केली होती. त्यांनी ऊर्जा विकास अभिकरणाचे महासंचालक यांना अहवाल तयार करण्याच्या लेखी सूचना  दिल्या होत्या. 

तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले होते. आता पुन्हा एकदा आपण या मागणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहा हजार हेक्टरला फायदा

दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ७५० अश्वशक्तीचे जवळपास नऊ पंप कार्यरत आहे. यामुळे विजेचा जास्त वापर होतो. ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे दहिगाव येथील पंपहाऊसच्या जवळ सौरऊर्जा प्रकल्प राबववा. त्यावर ही योजना कार्यान्वित केल्यास वीजेची बचत होईल. शिवाय वीजेअभावी ही योजनेचा पाणी पुरवठाही खंडित होणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT