‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या  शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या’
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या’  
मुख्य बातम्या

‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या’

टीम अॅग्रोवन

अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजनेच्या  सत्यापनाच्या कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सामान्य सुविधा केंद्र (सीएससी) संचालकांना दिले. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले  शेतकरी  कर्जमाफी  योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या शुक्रवारी (ता. २१) प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकांची पडताळणी सामान्य सुविधा केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सुविधा केंद्र, महाऑनलाइन संचालकांची बैठक घेतली. कर्जमुक्ती योजनेच्या आधारकार्डानुसार लाभार्थ्याचे सत्यापन व प्रमाणीकरणाचा कार्यक्रम विशेष मोहिमेंतर्गत २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत गावोगावी राबविण्यात येणार आहे याची अंमलबजावणी पडताळणीच्या कामासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येऊन त्यांना योग्य सहकार्य करण्यात यावे. समाधानकारक काम न केल्यास संबंधित ‘सीएससी’ संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी शलाका सरोदे, सीएससी सेंटरचे संजय यादव यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT