reservation  post of Sarpanch announced सरपंच, आरक्षण, नांदेड, ग्रामपंतायत
reservation post of Sarpanch announced सरपंच, आरक्षण, नांदेड, ग्रामपंतायत 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर होणार

टीम अॅग्रोवन

नांदेड : आगामी काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबंधित तहसील कार्यालयांच्या स्तरावर जाहीर होणार आहे. यात जिल्ह्यातील सर्वच १ हजार ३०९ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.   जिल्ह्यात एकूण १ हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर आदिवासी १ हजार १६६ तर अनुसूचित क्षेत्रात (आदिवासी) १४३ ग्रामपंचायती आहेत. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबंधित तहसीलदारांनी नेमलेल्या जागेत जाहीर होणार आहे. त्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग व खुला प्रवर्ग असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण १ हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर अनुसूचित क्षेत्रात १ हजार १६६ ग्रामपंचायती आहेत. तर अनुसूचित क्षेत्रात १४३ ग्रामपंचायती आहेत. गुरुवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील १ हजार १६६ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी २२८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव ठेवण्यात आले आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी ८२, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ३१५ तर खुल्या गटासाठी ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदे अनुसूचित जमाती करिता निश्चित केली आहेत. त्यातील एक द्वितीयांश पदे महिलांसाठी निश्चित करण्यात येणार आहेत.  

सरपंच पदाचे जाहीर होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अर्धापूर - ४६, भोकर - ६६, बिलोली - ७३, देगलूर - ९०, धर्माबाद - ४५, हदगाव - ११८, हिमायतनगर - ५२, कंधार - ११६, लोहा - ११८, किनवट - १३४, माहूर - ६२, मुदखेड - ५०, मखेड - १२८, नायगाव - ८०, नांदेड - ७३, उमरी - ७३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT