राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’ : कृषिमंत्री भुसे
राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’ : कृषिमंत्री भुसे 
मुख्य बातम्या

राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’ : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन

मुंबई : शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रांतील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारे तालुकास्तरावर अभियान घ्यावे, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी विभागाला दिले आहेत. महिनाभरात ही बॅंक तयार करावी, अशा सूचनाही कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत. विभागाची कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी नुकतेच पुणे येथे कृषी आयुक्तालयाच्या सर्व विभागांची बैठक घेतली. कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचीही त्यांनी बैठक घेतली. शनिवारी त्यांनी मंत्रालयात सुमारे तीन तास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक, सहसंचालक, तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेतली. क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या विविध अडचणींची माहिती कृषिमंत्र्यांनी करून घेतली.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायमच शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याचे सांगत शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना राबवाव्यात, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले. राज्यात अनेक शेतकरी परिस्थितीशी मुकाबला करत शेतीत आमुलाग्र बदल करणारे नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगाला यशदेखील येत आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात अपेक्षित वाढदेखील होताना दिसतेय. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथा बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यास त्यांनाही फायदा होऊ शकतो. त्यासाठी फळपीके, भाजीपाला यासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी, अशी सूचना कृषिमंत्र्यांनी केली. या शेतकऱ्यांच्या बॅंकेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन तेही प्रात्यक्षिकांसह देण्याचा मानस असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रयोगशील शेतकऱ्यांची यादी करून त्यांचा वापर प्रशिक्षणासाठी करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT