Record planting of onion in Nagar district this year 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याची यंदा विक्रमी लागवड 

नगर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप, रब्बीत मिळून कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. यंदा दोन्ही हंगामांत मिळून तब्बल १ लाख ८१ हजार २५६ हेक्टर क्षेत्रावर कांदा उत्पादन घेतले.

टीम अॅग्रोवन

नगर : नगर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप, रब्बीत मिळून कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. यंदा दोन्ही हंगामांत मिळून तब्बल १ लाख ८१ हजार २५६ हेक्टर क्षेत्रावर कांदा उत्पादन घेतले. विशेष म्हणजे कांदा दरात सातत्याने चढउतार, पावसाने नुकसान आणि बियाण्यांच्या गंभीर टंचाईला सामारे जावे लागूनही क्षेत्र वाढले आहे. मागील काही वर्षांत दुष्काळाच्या झळा सोसलेल्या भागात कांद्याचे क्षेत्र अधिक आहे. 

नगर जिल्ह्यात दरवर्षी साधारण ८० हजार ते एक लाख हेक्टरपर्यंत कांद्याची लागवड होत असते. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. मात्र सातत्याने पाऊस सुरू राहिल्याने रब्बीतील ज्वारीसह अन्य पिकांची पेरणी वेळेत करता आली नाही. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र घटले. त्यात कापसाचा हंगाम पूर्ण होण्याआधीच बोंड आळी व पावसाच्या नुकसानीने कापूस काढून टाकावा लागला. या सगळ्या बाबींचा परिणाम गहू व कांदा लागवडीवर झाला आहे. यंदा रब्बीत आतापर्यंत १ लाख ५३ हजार ९७१ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. खरिपात यंदा २७ हजार २८५ हेक्टरवर कांदा पीक घेतले. 

जिल्ह्यात यंदा कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण केली गेली. मागणी असलेले बियाणे दुप्पट दराने खरेदी करावे लागले. त्यात पावसाळ्यात कांद्याचे मोठे नुकसान झाले. दरातही चढउतार सुरूच आहेत. असे असतानाही कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. विशेष करून दुष्काळाच्या झळा सोसलेल्या तालुक्यात कांदा लागवड अधिक झाली आहे. एवढ्या प्रमाणात कांदा लागवड होण्याची ही नगर जिल्ह्यात पहिलीच वेळ आहे. 

बियाण्यात मात्र फसवणूक  कांदा बियाण्यात यंदा मात्र अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. रब्बीत गावरान कांद्याची लागवड होत असते. यंदा अनेक कांदा उत्पादक कंपन्यांकडून विकल्या गेलेल्या बियाण्यात भेसळ असल्याचे उत्पादन हाती आल्यानंतर स्पष्ट झालेय. त्याचा कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होऊनही कोणत्याही कंपनीवर आजपर्यंत कृषी विभागाने कारवाई केलेली नाही. 

दुष्काळी भागात क्षेत्र अधिक  नगर जिल्ह्यात यंदा कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. त्यात यंदाची लागवड पाहता अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या पारनेर, नगर, कर्जत, संगमनेर, पाथर्डी तालुक्यात कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 

पाच वर्षांतील लागवड स्थिती 
२०१५-१६ १,२१,११२
२०१६१७ ८९,४१३ 
२०१७-१८ १,०३४२६ 
२०१८-१९ ६५,५२२
२०१९-२० १,५२,९०० 
२०२०-२१ १,८१,२५६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: शेतीत रमलेला डॉक्टर

Ativrushti Madat: परभणी, हिंगोलीकरिता ६० कोटी ७३ लाख मंजूर

Rangada Kanda Cultivation: रांगडा कांदा लागवडीचे सुधारित तंत्र

Crop Harvesting Experiment: शेतकऱ्यांच्या नजरा आता पीक कापणी प्रयोगाकडे

Agrowon Diwali Article: निसर्ग, परिसंस्थेसोबत जोडून घ्या...

SCROLL FOR NEXT