received less rainfall in 69 circles in June and July in  Nanded, Parbhani, Hingoli
received less rainfall in 69 circles in June and July in Nanded, Parbhani, Hingoli  
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये ६९ मंडळांत कमी पाऊस

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९ मंडळांमध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात जूनपाठोपाठ जुलै महिन्यात कमी पाऊस झाला. तर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मात्र जास्त पाऊस झाला.

यंदाच्या १२ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार पावसाच्या सरासरीत सुधारणा करण्यात आली. महावेध प्रकल्पांतर्गंत प्रत्येक महसूल मंडळातील पर्जन्यमानाची आकडेवारी कृषी विभागाच्या महारेन संकेतस्थळावर देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी २४४.३० मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात २०९.२ (८५.६३ टक्के) पाऊस झाला. तर जून, जुलै महिन्यात ३९९.७ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात ३५० मिमी (८७.६ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यतील ५७ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यात २१९.२० मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, तो २२९ मिमी (१०४.६ टक्के) झाला. जून, जुलै महिन्यात सरासरी ३६४.५ मिमी पाऊस आहे. परंतु, प्रत्यक्षात ४२६.१ मिमी (११६.९ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यातील ३१ मंडळांत सरासरी पेक्षा जास्त, तर ८ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी २३०.२० मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात २७६ मिमी (१२०.१ टक्के) पाऊस झाला. जून, जुलै महिन्यात ३९९.४ मिमी पाऊस अपेक्षित आहे. पंरतु, प्रत्यक्षात ५१२ मिमी (१२८.२) टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील २६ मंडळात सरासरीपेक्षा जास्त, तर ४ मंडळांत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस स्थिती ( कंसांत टक्केवारी)

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर (८९.९), नांदेड ग्रामीण (९८.१), वजीराबाद (९१.३), तुप्पा (८५.), वसरणी (८६.९),तरोडा (९८.२), अर्धापूर (८६), दाभड (८८.७), मुदखेड (७९.८), मुगट (८६.६), हदगाव (८२.९), तळणी (८३), निवघा (७१.५), तामसा (७१.६), पिंपरखेड (८८.६), आष्टी (६३.८), माहूर (७१.९), वानोळा (५९.९), वाई (७४.९), सिंदखेड (५३.९), किनवट (८६.७), बोधडी (७३.३), इस्लापूर (६९.७), जलधारा (६९.७), शिवणी (७३.४), मांडवी (६३.३), दहेली (६०.२), हिमायतनगर (८४.३), जवळगाव (९९.५), सरसम (७८.९), भोकर (९४.३), मातुल (८२.५), किनी  (८०.२),उमरी (८५.९), गोळेगाव (६५.७), करखेली (७०.४), जारिकोट (७६.४), बिलोली (८६.९), सगरोळी (९७), कुंडलवाडी (६६.९), आदमपूर (५३.४), लोहगाव (८७.७), खानापूर (९७.३), मालेगाव (६६.६), शहापूर (९५.२), हनेगाव (८९.८), मुखेड (८४.७), जाहूर (८९.५), चांडोळा (६८.९), कंधार (८७.१),  कुरुला (८९.६), फुलवळ (९४.८), पेठवडज (८१.८), बारुळ (८८.४), लोहा (९६.३), सोनखेड (९२), शेवडी (९०.३).

परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण (८४.१ ), पेडगाव (८९.५ ), झरी (८३.६ ),दैठणा (८१.२),सावंगी म्हाळसा (९३.७), बामणी (९८.९), महातपुरी (९५.७),माखणी (९५.५),

हिंगोली जिल्हा ः आंबा (८४.६ ), गिरगाव (७७.३), साखरा (८६.३ ), हत्ता (८३.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT