Ravalgaon's Jadhavas feel the need for 111 sacks of wheat
Ravalgaon's Jadhavas feel the need for 111 sacks of wheat 
मुख्य बातम्या

रावळगावच्या भावसा जाधव यांनी गरजूंना वाटला १११ पोते गहू

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने अनेक शेतमजूर तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक घटकांचा रोजगार संपुष्टात आले आहे, अशा परिस्थितीत अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच परिस्थितीत जिल्ह्यातील रावळगाव (ता. मालेगाव) येथील शेतकरी व इलेक्ट्रिक व्यावसायिक भावसा जाधव यांनी गरजूंसाठी १११ पोती गहू वाटप केला आहे. या अडचणीच्या काळात आधार ठरले आहेत.      मूळचे सातमाणे येथील असलेले श्री. जाधव व्यवसायाच्या निमित्ताने रावळगाव येथे स्थायिक आहेत. ते आपल्या शेतावर चकरासाठी गेले असताना काही मजूर भिक्षा मागत असताना त्यांना दिसले. या गरजू घटकांना मदत करण्याची ही कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी घरी येताच त्यांचे वडील राघो जाधव यांना विचारून मदत करण्याचे ठरविले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ होकार दिला.

त्यांनी गावातील व्यापाऱ्यांकडून ३ लाख रुपयांचा १२५ पोती गहू विकत घेतला. ज्यांना गरज आहे अशा गावातील प्रत्येक गरजूंना दीड पायली म्हणजेच १० किलो इतका गहू वाटप केला. ते स्वतः शेतकरी असले तरी वाटपासाठी गहू नसताना दीड लाख आगाऊ रक्कम देऊन गहू खरेदी केला. गावात गहू वितरित करण्यासाठी प्रत्येकाला एक कुपण देऊन ‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये ही खबरदारी घेऊन गहू वाटला. त्यामुळे गरजूंना पुढील पंधरा दिवसांपर्यंतची सोय त्यांनी केली आहे. याकामी त्यांना सामाजिक भावनेने त्यांच्या मित्रपरिवार मदतीला धावून आला . 

'चला मदतीचा हात देऊ, गोर गरीबांना साथ देऊ' ही भावना जपत सामाजिक कार्याचा एक आदर्श त्यांनी घडविला आहे. अशाच प्रकारे शेकडो मदतीचे हात पुढे येऊन सामाजिक कर्तव्य पार पाडत मानुसकी जपावी, अशी भावना श्री. जाधव यांनी बोलताना व्यक्त केली.

शेती असली तरी मी सर्वसाधारण शेतकरी आहे. गरजेच्या वेळी मदत केल्यास काही कमी पडत नाही,यावर माझा विश्वास आहे.  - भावसा जाधव, रावळगाव, ता. मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT