रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान  Ratnagiri of 'ZP' 80 crore loss
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान  Ratnagiri of 'ZP' 80 crore loss 
मुख्य बातम्या

रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान 

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात पूर, दरड कोसळून जिल्हा परिषद मालमत्तेचे सुमारे ८० कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय विविध तेराशे पशुधनाचा मृत्यू झाल्यामुळे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे.  अतिवृष्टी, महापुराचा सर्वाधिक फटका चिपळूणला शहरासह ग्रामीण भागाला बसला आहे. व्यापारी वर्गाला नुकसानीतून बाहेर पाडण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल. रत्नागिरी आणि चिपळूण बांधकाम विभागात पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेचे ६६ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात दरड कोसळून रस्ते खचले आहेत. २६९ रस्ते, ८१ पूल आणि मोऱ्या, ३७ साकव, १३ इमारती मिळून ४०० ठिकाणचे नुकसान झाले आहे. फक्त रस्त्याचे सुमारे ३९ कोटी १० लाख नुकसान आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सुमारे ७ कोटींचे नुकसान आहे. त्यात ७४ पाणी पुरवठा योजना आणि ३७ विहिरींचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या ३ आरोग्य केंद्राचे पाच लाखाचे नुकसान झाले. पावसात ४१ शाळा बाधित झाल्या असून, १९ संरक्षक भिंत, सात शौचालये आणि ४ किचन शेड पडले आहेत. शिक्षण विभागाचे २ कोटी २२ लाखांचे नुकसान आहे. अंगणवाडीच्या ३५ इमारतींना फटका बसला असून, २५ अंगणवाडीच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभ घेतलेल्या १२ घरांचे ४४ लाखांचे नुकसान झाले आहे.  पुराचे पाणी भात शेतात घुसून १९९.९१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. फळ झाडांचे साडेपाच हेक्टर तर इतर पिकांचे सुमारे तीन हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे. भातशेतीत गाळ साचल्यामुळे दुबार पिकांची शक्यता नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.   

तेराशे जनावरांचा मृत्यू  पुरात वाहून किंवा दरड कोसळून विविध प्रकारची सुमारे तेराशे जनावरे मृत पावली आहेत. त्यामुळे सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यात ९८ गाई, बैल तर ३९ म्हशी व रेडे, ५४१ कोंबड्या, १० शेळ्यांसह अन्य ६८९ जनावरे मृत पावली आहेत.

  • असे झाले नुकसान
  • पूल वाहून वाड्यांचा संपर्क तुटला 
  • इंदिरा आवसाची घरे कोसळली 
  • योजना वाहून गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 
  • सर्वाधिक नुकसान रस्त्यांचे 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT