‘साकळाई’साठी दौंड महामार्गावर ‘रास्ता रोको’
‘साकळाई’साठी दौंड महामार्गावर ‘रास्ता रोको’ 
मुख्य बातम्या

‘साकळाई’साठी दौंड महामार्गावर ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन

श्रीगोंदे, जि. नगर : श्रीगोंदे व नगर तालुक्‍यांतील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेचे घोंगडे भिजत पडले आहे. ही योजना मंजूर करून ती पूर्ण करण्यासाठी दोन्ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या कृती समितीच्या पुढाकाराने चिखली रविवारी (ता. ३) येथे नगर-दौंड महामार्ग अडविण्यात आला. 

ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीगोंदे व नगर तालुक्‍यातील, पाण्यापासून वंचित गावांना या साकळाई योजनेचा फायदा होणार आहे. वीस वर्षांपूर्वी सरकारने या योजनेचे सर्वेक्षण केले. मात्र, त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याने आज कृतिसमितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून आंदोलन केले. 

या वेळी उपस्थित प्रमुखांनी, ही योजना पूर्ण करण्यासाठी कुकडी प्रकल्पातील पाणी विसापूर तलावात सोडून, तेथून उपसा सिंचनाद्वारे साकळाई डोंगराच्या पायथ्याशी टाकून ते वंचित गावांना देण्याची मागणी केली. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणीही करण्यात आली.

या वेळी रामदास झेंडे, बबनराव पडवळकर, संतोष लगड, पुरुषोत्तम लगड, झुंबर बोरुडे, बाबा महाराज झेंडे, सुरेश काटे, बाळासाहेब नलगे, सोमनाथ घाडगे, रमेश भामरे यांची भाषणे झाली. आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, दिनकर पंधरकर, विश्वास थोरात, रवींद्र भापकर, दादा चितळकर आदी या वेळी उपस्थित होते. महसूल यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT