राजू शेट्टी
राजू शेट्टी 
मुख्य बातम्या

राजू शेट्टी यांची कवितेद्वारे कार्यकर्त्यांना भावनिक साद

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’चे मावळते खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर उसंत न घेता शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कवितेद्वारे सोमवारपासून (ता. २७) संघर्षाचा नवा अध्याय सुरू केल्याचे म्हटले आहे. 

आजपासून या शिर्षकाच्या कवितेत त्यांनी भावनिकपणे आपल्या पराभवाची कारणे देत मी बळिराजाच्या काळजात घर केल्याने मला कोणी बेदखल केल्याची भीती नसल्याचे म्हणले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कविता व्हायरल करून गोरगरिबांच्या हक्कांसाठी, भूमिपुत्रांसाठी नवा एल्गार करीत असल्याचे जाहीर केले आहे. शेट्टी यांनी ही कविता सादर करून कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

आजपासून... मी संत नाही शांत आहे  गोतावळ्यातून दुरावलो  याची मनात खंत आहे  कट करून गाडलेल्या  बळीचा मी पुत्र आहे  ज्याला फळं त्यालाच दगडं हे जगाचं सूत्र आहे. मी खचलो नाही थोडासा टिचलो आहे  ते कोण मला  बेदखल करणार?  मी बळिराजाच्या काळजातच  घर करून बसलो आहे. म्हणून चला...  भूमिपुत्रांनो उठा  नवा एल्गार करू...  गोरगरिबांच्या हक्कासाठी  आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरू...!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT