Rainfall in five circles in Aurangabad, Jalna district
Rainfall in five circles in Aurangabad, Jalna district  
मुख्य बातम्या

औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत पावसाचा जोर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जोरदार पाऊस झाला. बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात तुरळक, हलका पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील ३३, हिंगोली १८, औरंगाबाद ४८, परभणी ६,  उस्मानाबाद ७, नांदेड २९, लातूर ४३, तर जालना जिल्ह्यातील २४ मंडळांत हलका पाऊस नोंदला गेला. बीड जिल्ह्यातील पिंपळा मंडळात २१.५, तर कडा मंडळात २२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा मंडळात २१.३ मिलिमीटर, भावसिंगपुरा २५, लाडसावंगी ५३.८, हरसुल २४.८, आडुळ २०.५, गारज २२.३, चिंचोली २०.३, सिल्लोड २५.८, तर अजिंठा मंडळात ३७.३ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील शेळगाव मंडळात ५९.५, रोशनगाव ४६.५, जालना शहर २१.३, तर भोकरदन मंडळात २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार, सोयगाव, करमाड, चित्तेपिंपळगाव या चार मंडळांसह जालना जिल्ह्यातील बदनापूर मंडळात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसाची मंडळे (मि.मी) : औरंगाबाद जिल्हा ः वडोद बाजार ७८, सोयगाव ८३, करमाड ७४, चित्तेपिंपळगाव ११७.३. जालना जिल्हा ः बदनापूर ८२.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT