crop damage
crop damage 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा 

टीम अॅग्रोवन

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथे घरावरील पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने वृद्धेचा तर आडगाव येथे तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. सततच्या पावसाने फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. 

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने भाजीपाला नेता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पाथर्डी, नगर, पारनेर, राहुरी, नेवासा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. एकतर कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बाजारात भाजीपाला, फळे नेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच पावसाने हाती आलेला भाजीपाला, फळांसह काढणीला आलेला गहू, कांदा, चारापिकांचे नुकसान होत आहे. तीन दिवसानंतरही अजून नुकसानीचा प्राथमिक अहवाल आलेला नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसात सुमारे दिड हजार हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

शुक्रवारी सायंकाळी पाथर्डी तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसाने सोनोशी (ता. पाथर्डी) येथे वादळाने उडालेले घरावरील पत्र्याचे शेड अंगावर पडून कलाबाई उत्तम दौंड (वय 80) या वृद्धेचा तर आडगाव येथे खंडू रामा लोंढे (वय 21) या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. 

दरम्यान, पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT