Rain in 313 circles in Marathwada
Rain in 313 circles in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील ३१३ मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ३१३ मंडळांत पावसाने हजेरी लावली. आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. जालना औरंगाबाद लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील ५५ मंडळात हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. देवणी व देवर्जन या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडळांत, परभणी जिल्ह्यातील ३३ मंडळांत, नांदेड जिल्ह्यातील ३१ मंडळांत, जालना जिल्ह्यातील ४० मंडळांत हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अंतरवली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

औरंगबाद जिल्ह्यातील ६३ मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. गंगापूर तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या तालुक्यातील शेंदूरवादा, भेंडाळा, मांजरी, गंगापूर या मंडळात तसेच डोणगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ४१ मंडळांत, उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला.  जिल्हानिहाय पाऊस(पाऊस मि.मी) 

लातूर जिल्हा ः साकोळ ३५.५०, वलांडी ४०, बोरोळ ४०, पळशी २६.२५, कारेपूर २६.२५, पानगाव २६.२५, पोहरेगाव २२.२५, रेनापुर २९.७५, चाकूर २१.७५, वाडवळ, २१.७५, कासार शिरशी २२.७५, अंबुलगा ३३, पानचिंचोली ३१.२५  औरंगाबाद जिल्हा ः वडोद बाजार ६१ ,आळंद २८.५०, पिरबावडा ३८.२५, आंबी २१.७५, बोरगाव २६, आमठाणा २३ ,भराडी २०, निल्लोड ५०, सिल्लोड ३५.२५, सुलतानपूर २६.७५, नाचनवेल ३७.७५ , पिशोर २६, चिकलठाण ३४.७५, देवगाव ३७.५०, चापानेर ३७.२५, कन्नड ४३.२५, लाडगाव ३०, नागमठाण ४४, महालगाव ४९ ,लासुरगाव ३०.५०, गारज ३९.७५, खंडाळा ३६.२५, बोरसर३३.७५, सिद्धनाथ ४२, हरसुल ३४.५० ,तुर्काबाद २३.७५, बिडकीन २३.२५, बिडकीन२४.५०, पिंपळवाडी २२. ५० ,औरंगाबाद २६, उस्मानपुरा २० ,भावसिंगपुरा २७, कांचनवाडी ३५.७५, चिकलठाण२१, चित्तेपिंपळगाव २१.५०, करमाड २३. ५०, लाडसावंगी ३२.५०, हरसुल २१.५०, चौका ३०.७५  बीड जिल्हा ः बीड २१.५० , पाली २१.५०, रेवकी २५ ,तलवाडा २५ , माजलगाव २५.२५, कीट्टीवडगाव २५.२५, पाटोदा ३९.७५, घाटनांदुर ३७.५०, बर्दापूर २६.२५. उस्मानाबाद जिल्हा ः केशेगाव २८.५०, तुळजापूर २८.५०  अतिवृष्टीची मंडळे (पाऊस मि.मी)

डोणगाव ७१.२५ 
शेंदुरवादा ६८.५०
भेंडाळा ७६.७५
मांजरी ९१.७५
गंगापूर ८७ 
देवणी ७२.२५
देवर्जन ७२.२५ 
अंतरवली ७१.२५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT