संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात रब्बीची ३१ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील विविध पिकांची आतापर्यंत ३१.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये रब्बी ज्वारीची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात काही ठिकाणी झालेला पाऊस रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम असला, तरी सध्या या तालुक्यांना दुष्काळ्याच्या झळा बसत आहेत. त्यातूनही पाऊस पडेल या आशेवर रब्बी पेरणीची कामे संथगतीने सुरू आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी ६७ हजार ८४४ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कोरेगाव तालुक्‍यात १६ हजार २९७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झालेली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार ९१२ हेक्‍टर असून, त्यापैकी ५८ हजार ५११ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ४२.०६ टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८६३ हेक्‍टर असून त्यापैकी ५ हजार ३६५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, तीन हजार ३२७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७३ हेक्‍टर असून, ३४६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून चाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ज्वारी व मका पिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात पेरणीच्या कामांना गती आली आहे. थंडीत वाढ होईल तसा हरभरा व गहू पिकांच्या पेरणीस वेग येणार आहे.   पेरणी झालेले तालुकानिहाय क्षेत्र (हेक्‍टर) : सातारा ६३८३, जावळी २४१८, पाटण ५०२१, कऱ्हाड १३९१, कोरेगाव १६,२९७, खटाव ९७५२, माण ५८१६, फलटण ८९२२, खंडाळा ४४७८, वाई ७३११, महाबळेश्वर ५५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT