संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी लागवड

टीम अॅग्रोवन

पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे पौष्टिक धान्य म्हणून राज्यात रब्बी हंगामात २७ लाख हेक्टरवर ज्वारीचा पिकाची लागवड तसेच जनजागृती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे, अशी माहिती कृषी संचालक विजय घावटे (विस्तार) यांनी दिली.

रब्‍बी हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक असले तरी कृषी विभागाने लागवड सल्ला किंवा बियाणे उपलब्धता वगळता पौष्टिक पीक म्हणून प्रसाराचे काम यापूर्वी केलेले नाही. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून ज्वारीला पौष्टिक पीक म्हणून पुढे आणण्यासाठी कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. अन्न सुरक्षा अभियानातून  ज्वारीसाठी राज्याच्या काही भागांत प्रात्यक्षिके घेतली जातील. मात्र, पौष्टिक धान्य म्हणून ज्वारीला राज्याच्या  सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत आणून स्वस्तात ज्वारीची विक्री व्हावी, हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रांची संख्या जास्त असावी, असादेखील प्रयत्न केला जाईल, असे श्री. घावटे यांनी स्पष्ट केले.

राज्यात अन्न सुरक्षा अभियान राबविण्यासाठी २४० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यातून यंदा गहू, धान, कडधान्ये व तसेच पौष्टिक धान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पौष्टिक धान्य म्हणून ज्वारीचा प्रसार कोणत्या पद्धतीने करावा यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा घेतली जाणार आहे. यात प्रक्रिया उद्योजक, शेतकरी, कृषी अधिकारी यांचा समावेश असेल, असे श्री. घावटे म्हणाले.

दरम्यान, राज्यात सर्वांत जास्त रब्बी ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या पुणे विभागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत ५५० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झालेला होता. ज्वारीला उसापेक्षा कमी पाणी आणि साखरेचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे चारा आणि धान्य विक्री अशा दुहेरी हेतूने लागवड केली जाते. काही साखर कारखान्यांनी इथेनॉलसाठी ज्वारी लागवड वाढविण्याचा सल्ला दिला आहे. हेक्टरी ८० टन उत्पादन देणाऱ्या इथेनॉलनिर्मितीस उपयुक्त ठरणाऱ्या वाणाचा प्रसार करण्यात आला आहे. राज्यातदेखील या वाणाचे प्रयोग मराठवाड्याच्या काही भागात घेतले जात आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT