परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाने रब्बी पिकांचे नुकसान
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाने रब्बी पिकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाने रब्बी पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १७) रात्री, तसेच मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतामध्ये सोंगून ठेवलेल्या तसेच उभ्या ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके भिजल्याने नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळामध्ये सर्वाधिक ३० मिमी पाऊस झाला. परभणी शहर मंडळात २ मिमी, परभणी ग्रामीण मंडळात ४ मिमी, पेडगाव मंडळात ५.६० मिमी, जांब मंडळात ५.३० मिमी, सेलू मंडळात ८ मिमी, देऊळगाव मंडळामध्ये ३ मिमी, कुपटा मंडळात ४ मिमी, वालूर मंडळात २ मिमी, चिकलठाणा मंडळात ३० मिमी, जिंतूर मंडळात २ मिमी, सावंगी म्हाळसा मंडळात ४ मिमी, चारठाणा मंडळात ३ मिमी, बामणी मंडळात ५ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत मंडळात २.२५ मिमी, आंबा मंडळात ३.७५ मिमी, हयातनगर टेंभुर्णी ३.५, कुरुंदा ३.५० मिमी आदीसह आंबा, वांरगा, औंढा, जवळा बाजार, साळणा, सेनगाव, गोरेगाव, आजेगाव, साखरा, पानकनेरगाव आदी मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मंडळासह अन्य मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. सध्या या तीन जिल्ह्यांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांची सुगी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेली ज्वारी, गहू तसेच हरभरा पिके भिजल्याने कडबा तसेच धान्याची प्रत खराब झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT