Quarantine Center at Akola Agricultural University Trouble
Quarantine Center at Akola Agricultural University Trouble 
मुख्य बातम्या

अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन सेंटर अडचणीचे

टीम अॅग्रोवन

अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वसतिगृहाच्या इमारतीत कोरोना रुग्णांचे क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आलेले असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या इमारती खाली करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतीच कुलगुरूंकडे केली आहे.

क्वारंटाइन केंद्रात राहणारे काही रुग्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची नासधूस करीत आहेत. अन्य साहित्यही  इतरत्र टाकत आहेत. यामुळे डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चिंता लागली आहे. याबाबत विद्यार्थी परिषदेने मागणी करीत या इमारती खाली कराव्यात, अशी मागणी केलेली आहे.

कोरोना क्वारंटाइन केंद्रासाठी विद्यापीठातील वसतिगृह, शेतकरी सदन प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून अधिग्रहीत केलेले आहेत. या वर्षातील शैक्षणिक सत्र अद्यापही बंद असल्याने विद्यार्थी वसतिगृहात नाहीत. मात्र, त्यांचे साहित्य त्या ठिकाणी ठेवलेले आहे. अशा स्थितीत काही रुग्ण हे साहित्याची फेकाफेक करीत असल्याचे पुढे आलेले आहे. एका विद्यार्थ्याचा मोबाईलसुद्धा लंपास करण्यात आल्याची बाब दिसून आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. कागदपत्रांची सुरक्षितता धोक्यात असल्याने विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे हा प्रकार मांडला. खोल्यांमध्ये असलेले कागदपत्रे, साहित्य परत करावे किंवा वसतिगृहातील क्वारंटाइन कक्ष इतरत्र हलवावा, अशी मागणी केली.

क्वारंटाइन सेंटर उघडलेल्या भागातील विद्यापीठाचेही सर्व कामकाज थांबलेले आहे. त्याचा विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजावर आता परिणाम होऊ लागला आहे. शासनानेच  या इमारती अधिग्रहीत केल्याने याविरुद्ध कोणी स्पष्टपणे बोलत नाही. परंतु आता जेव्हा विद्यार्थ्यांच्या वस्तू, कागदपत्रांचा विषय चव्हाट्यावर आला तेव्हा याची कुजबुज सुरू झाली. विद्यार्थ्यांचे हित पाहता प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याची मागणी वाढत आहे.

विद्यार्थ्यांपुढे पेच एमएस्सीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात प्रबंध सादर करण्याची मुदत आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांचे लॅपटॉप वसतिगृहातील कपाटात अडकलेले आहेत. त्यांचा डेटा यामध्ये असल्याने ते त्याचे विश्लेषण कसे करणार हाही आता पेच  बनला आहे. तसेच आगामी काळात बीएसस्सीचे सत्र सुरू झाले तर विद्यार्थ्यांचे काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT