pulses day  
मुख्य बातम्या

मागणीचा विचार करता कडधान्य उत्पादनाला मोठा वावः डॉ. शरद गडाख

टीम अॅग्रोवन

नगर: कडधान्यांमध्ये प्रथिनाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सर्वसामान्य आहारामध्ये कडधान्य महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात दररोज ८० ग्रॅम कडधान्य असणे गरजेचे असताना, सध्या फक्त ४३ ग्रॅम कडधान्य आहारात असते. त्यामुळे कडधान्य उत्पादनाला मोठा वाव असून त्याला मूल्यवर्धनाची जोड दिल्यास शेतकरी आर्थिक प्रगती साधतील, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.  जागतिक कडधान्य दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पात सोमवारी (ता. १०) शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उपसंचालक विलास नलगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल पाध्ये, काढणी पश्चात तंत्रज्ञान कृषी प्रकल्पाचे विभाग प्रमुख प्रा. कैलास कांबळे, कडधान्य शास्त्रज्ञ प्रा. लक्ष्मण म्हसे तंत्र अधिकारी सपकाळ, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, जनसंपर्क विभागाचे सचिन सदाफळ, विजय जाधव यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गडाख म्हणाले, ‘‘आता सध्या कडधान्य उत्पादनाला मोठा वाव आहे. कडधान्य गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्यांनी मूल्यवर्धनाची कडधान्य उत्पादनाला जोड देत संघटित होऊन विपणन केल्यास आर्थिक प्रगती साधता येईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हरभऱ्याचे १३ वाण विकसित केले असून, सध्या राज्यातील एकूण हरभऱ्याच्या क्षेत्रापैकी ३७ टक्के क्षेत्र हे विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाअंतर्गत आहे. आत्तापर्यंत पन्नास वर्षांत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल तेरा हजार कोटी रुपयांचा फायदा मिळाला. त्यामुळे कडधान्ये उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे.’’ कडधान्याला प्रतवारी, पॅकिंग, मूल्यवर्धनाची जोड दिल्यास चांगला फायदा होतो. शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे. विद्यापीठाने यंत्राच्या साह्याने करता येणाऱ्या हरभऱ्याचा वाण विकसित केला असल्याचे कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सांगितले. रायभान गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ प्रक्षेत्रावर शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. तसेच महात्मा फुले विद्यापीठाने काढलेल्या मार्गदर्शक दिनदर्शिकांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT