आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखल  Protesting farmers enter Delhi
आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखल  Protesting farmers enter Delhi 
मुख्य बातम्या

आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखल

टीम अॅग्रोवन

चंडीगड/ नवी दिल्ली  : केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करीत पंजाबमधील आंदोलक शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडकल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. दिल्लीत प्रवेश करण्यास मजाव केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. अखेर शुक्रवारी (ता. २७) दुपारी पोलिसांनी आंदोलकांना दिल्लीच्या बुराडी भागातील मोकळ्या जमिनीवर एकत्र येण्यास आणि शांततामय रीतीने निदर्शने करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे तणाव काही प्रमाणात निवळला आहे.  दरम्यान, बुराडी येथे शेतकरी टॅक्टरसह अन्य वाहनांनी एकत्र येत आहेत. शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन बंद झाल्यामुळे दिल्ली-हरिद्वार महामार्ग सुरू करण्यात आला आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता.२८) उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. 

पहाटे दिल्लीच्या सीमेवर धडकले  शेतकरी आंदोलन शुक्रवारही (ता. २७) सुरूच राहिले. रात्रभर ठिय्या मारून बसलेले शेतकरी शुक्रवारी पहाटे पुन्हा घोषणा देत हरियाना-दिल्लीच्या सीमेवरील सिंघुु आणि टिकरी येथे धडकले. सीमेवर तैनात पोलिसांनी त्यांना अडविले. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांची नळकांडी फोडली. पंजाबमधील शेतकऱ्यांचा आणखी एक गट बहादूरगड येथे पोहोचला होता. दिल्लीच्या फरिदाबाद आणि गुडगावच्या सीमेवरही पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

‘अश्रू धुरानी स्वागत’ पंजाबमधील फतेहगड साहिब येथील शेतकरी सिंहु सीमेवर पोहचले. ते म्हणाले, ‘आम्ही दिल्लीत प्रवेश करू. आमच्या या आंदोलनाचे स्वागत दिल्ली पोलिसांनी अश्रू धुराची नळकांडी फोडून केले.’ शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री  केजरीवाल यांनी केला आहे.

योगेंद्र यादव यांना अटक  शेतकरी संघटनांनी दावा केला आहे की, शुक्रवारी (ता. २७) रात्रीपर्यंत सुमारे पन्नास हजार शेतकरी आंदोलनात सहभागी होतील. ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्यासह पन्नास शेतकऱ्यांना गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. यादव शेतकऱ्यांसह हरियानातून दिल्लीकडे निघाले होते. दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील नऊ स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्याची परवानगी मागितली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT