palm oil
palm oil  
मुख्य बातम्या

खाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव रद्द? बाजार दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन

पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क कपात करण्याची वावडी व्यापारी सटोडियांनी उठविली होती. याकरिता ग्राहक मंत्रालयाच्या प्रस्तावाचा हवाला देण्यात आला होता. मात्र, सदर प्रस्ताव रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताने वायदे बाजारात खाद्यतेल आणि सोयाबीनच्या दरात मंगळवारी (ता. २८) सुधारणा झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  खरिपाचे घटलेले उत्पादन, मलेशियाकडून पामतेल आयातीवरील निर्बंधांनंतर खाद्यतेल आणि तेलबिया बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुधारणा आहे. मात्र, चार दिवसांपूर्वीच वायदेबाजार सटोडियाने खोडसाळपणा करत दर पाडण्याचा प्रयत्न केला होता. खाद्यतेलाच्या किमती एका मर्यादेपर्यंत वाढू लागताच केंद्रीय ग्राहक मंत्रालय नियमित स्वरूपात नियंत्रणाचे उपाय सुचवत असते. या वेळीही ग्राहक मंत्रालयाकडून असा प्रस्ताव केंद्रीय वाणिज्य मंत्रालयास पाठविण्यात आला होता. या पत्राचा हवाला देत केंद्र सरकार खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करणार असल्याच्या वावड्या सटोडियांकडून उठविल्या गेल्या. यासंदर्भातील वृत्त खासगी दूरचित्रवाणीवर प्रसारितही झाले, परिणामी खाद्यतेल आणि तेलबिया उत्पादकांना बाजार घसरून फटकाही बसला. वायदा आणि स्थानिक बाजारात सोयाबीनेच दर काही प्रमाणात कोसळले होते. दरम्यान, खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्यांसदर्भातील ग्राहक मंत्रालयाचा प्रस्ताव रद्द करण्यात येण्यासंदर्भात मात्र उशिरापर्यंत सरकारी सूत्रांकडून अधिकृत स्पष्ट करण्यात आले नाही.  बाजार लवकरच पूर्ववत होईल केंद्रीय ग्राहक मंत्रालयाकडून खाद्यतेल आयातशुल्क कमी करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाला पाठविण्यात आल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर खाद्यतेल आणि तेलबिया दर घसरुन उत्पादकांना फटक बसला. वायदा आणि स्थानिक बाजारात सोयाबीनेच दर काही प्रमाणात कोसळले होते. मात्र, मंगळवारी ग्राहक मंत्रालयाचा प्रस्ताव रद्दबातल करण्यात आल्याच्या वृत्तानंतर खाद्यतेल आणि तेलबिया बाजारात विशेषत: सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. काही दिवसांत सोयाबीनचे दर पुन्हा पूर्ववत होण्याचे संकेत व्यापारी सूत्रांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT