शेततळे
शेततळे  
मुख्य बातम्या

प्लॅस्टिक कागदाच्या अटीने कोंडी

टीम अॅग्रोवन

पुणे : मराठवाड्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसताना खोदलेल्या शेततळ्यात कुठून पाणी आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यासाठी कारणीभूत ठरली आहे ती प्लॅस्टिक कागद अंथरण्याची अट.  राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अर्थात एनएचएममधून सामूहिक शेततळ्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. मात्र, अनुदान हवे असल्यास शेततळ्यात प्लॅस्टिकचा कागद तातडीने अंथरण्याची अट टाकण्यात आली आहे.  सामुदायिक शेततळ्याचे अनुदान मिळवण्यासाठी खोदाई, कुंपण आणि प्लॅस्टिक कागद अंथरणे अशा तीन बाबी शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. मात्र, भर उन्हात प्लॅस्टिक कागद टाकल्यास उष्णतेचा परिणाम तसेच वाऱ्यामुळे कागद उडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते.  "आम्ही शेततळे खोदून तयार ठेवले आहे. मात्र, सध्या पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. तळ्यात तर पावसाळा येईपर्यंत पाणी येणारच नाही. त्यामुळे प्लॅस्टिक कागद थेट पावसाळ्यातच टाकावा लागेल. मात्र ते कृषी विभागाला मान्य नाही, असे मराठवाड्यातील शेतकरी बाळासाहेब रघुनाथ पांढरे (चिंचोलीराव, ता. जि. लातूर) यांनी सांगितले.  मी ९५ रुपये मीटरप्रमाणे एक लाख ६० हजार रुपयांचा १६०० मीटर प्लॅस्टिक कागद खरेदी करणार आहे. मात्र, भर उन्हात तळ्यात कागद अंथरल्यास तो फाटून माझे नुकसान होईल. कागद खरेदी करून त्याचे बिल देण्यास मी तयार आहे. पण, कृषी विभागाला हा पर्यायदेखील मान्य नाही, असेही श्री. पांढरे म्हणाले.  लातूरच्या गंगापूर भागातील सुधाकर शिंदे, सुशील वाघे, तुकाराम भुसे, बालाजी भुसे या शेततळेधारकांचीही हीच समस्या आहे. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ‘एसएओं’शी संपर्क साधला. मात्र, चार महिन्यांत शेततळ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश असल्याने त्यात आताच कागद टाकावा लागेल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत, असे शेतकरी तुकाराम भुसे (गंगापूर, ता. जि. लातूर) यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT