modi
modi 
मुख्य बातम्या

पंतप्रधान मोदी यांचा थेट माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याशी संवाद 

टीम अॅग्रोवन

राहुरी : "हॅलोऽऽ चंद्रशेखरजी! गाव में हो? कैसा चल रहा हैं?' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चिरपरिचित धीरोदात्त आवाज कानी पडताच राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रचंड उत्साहित झाले. दोन मिनिटांच्या संभाषणात कदम यांनी राहुरी तालुक्‍याचा व देवळाली प्रवरा शहराचा आढावा सांगितला. आवर्जून फोन केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. कोरोनाविरुद्ध संघर्षासाठी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. 

देवळाली प्रवरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून स्वयंसेवक असलेल्या कुटुंबाचे तिसऱ्या पिढीतील सदस्य, शिर्डीच्या श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष, राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.२५) सकाळी नऊ वाजता भ्रमणध्वनीवर संवाद साधला. अवघ्या दोन मिनिटांत पंतप्रधान मोदी यांनी आरएसएसच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या कामाचा, त्यांच्या आसपासच्या परिसराचा आढावा घेतला. कसं आहे, कोठे राहता, तुम्ही राहता त्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत का, लोकांच्या जेवणाची सोय आहे का यासह इतर बाबीची माहिती घेतली. कदम यांनाही सर्व माहिती सांगितली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT