राज्यपालांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचा गौरव
राज्यपालांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचा गौरव 
मुख्य बातम्या

राज्यपालांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचा गौरव

टीम अॅग्रोवन

सांगली ः यशवंत पंचायतराज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. २६) गौरव केला.

अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी शिराळा, आटपाडी पंचायत समित्यांनाही बक्षीस देण्यात आले. मुंबईतील रवींद्र नाट्यगृृहात यशवंत पंचायतराज अभियानाचे बक्षीस वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे होत्या. यशवंत पंचायतराजमध्ये जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. शिराळा पंचायत समितीने राज्य पातळीवर, तर आटपाडी पंचायत समितीने पुणे विभागात प्रत्येकी तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषदेने स्वच्छता, सामान्य प्रशासनासह सर्वच विभागांत केलेल्या लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर २०१६-१७ या वर्षाचा राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला होता. तो स्वीकारण्यासाठी जुने-नवे पदाधिकारी एकत्र गेले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या. दिव्यांग अभियानासारख्या राज्यासमोर आदर्श ठरलेल्या नावीण्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानमध्ये तर जिल्हा परिषदेने झपाटून काम केले. मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देशमुख, उपाध्यक्ष बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे स्थान बळकट ः संग्रामसिंह देशमुख राज्यात मिळालेल्या पहिल्या स्थानामुळे जिल्हा परिषदेचे स्थान आणखीच बळकट होऊन पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास आणखीनच बळावल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केली. दिव्यांग अभियान राज्यासमोर आदर्श नावीण्यपूर्ण योजना ठरली. स्वच्छ भारत अभियानामध्ये तर जिल्हा परिषदेने झपाटून काम केल्याने यश मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT