The price of sugarcane has gone up 
मुख्य बातम्या

शेवग्याला दराची झळाळी

राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये शेवग्याची मोठी टंचाई दिसून येत आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेवग्याच्या आवकेत मोठी घट झाली असून आवकही अनियमित होत आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेवग्याचे अतोनात नुकसान झाले आहे. फुलोऱ्याच्या वेळेसच पावसाने दणका दिल्याने फूलगळ झाली आहे. याचा फटका नव्याने येणाऱ्या शेवगा पिकाला बसला. यामुळे राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये शेवग्याची मोठी टंचाई दिसून येत आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेवग्याच्या आवकेत मोठी घट झाली असून आवकही अनियमित होत आहे

मागणीइतका पुरवठा होत नसल्याने पंधरा दिवसांपासून शेवग्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच शेवग्याचे दर किलोस २०० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नवीन पीक येईपर्यंत वाढलेले दर कायम राहतील, असा अंदाज सूत्रांचा आहे

तज्ज्ञ व शेतकरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थंडीमध्ये शेवग्याचे दर हे वाढलेलेच असतात. साधारणपणे शेवग्याचे दर हे ५० ते ८० रुपये दहा किलो सरासरी इतके असतात. थंडीचे प्रमाण वाढल्यास पीक कमी येत असल्याने फार फार तर १०० ते १५० रुपये इतका भाव काही काळ असतो. जानेवारीनंतर शेवगा सुरू झाल्यानंतर पुन्हा सरासरी इतके दर येतात. 

उष्ण व दमट हवामान शेवगा पिकाच्या वाढीस गरजेचे असते. कोरडे हवामान पिकाच्या फलधारणेसाठी अत्यंत लाभदायक व फायदेशीर ठरते. सरासरी तापमान २५-३० अंश सेल्सिअस फलधारणेच्या अवस्थेत महत्त्वाचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. गेल्या महिन्याभराचा कालावधी पाहिल्यास दररोज हवामान बदलत आहे. कधी  थंडी, तर कधी पाऊस यामुळे शेवग्याच्या फुलोऱ्याला हानी पोहोचत आहे. याचा विपरीत परिणाम शेवग्याच्या उत्पन्नावर झाला आहे. - प्रा. संग्राम धुमाळ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

या वर्षी वातावरण बदलाचा परिणाम हा शेवग्याच्या पिकांवर जास्त झाला. ढगाळ वातावरणामुळे पानगळ, फूलगळ अधिक झाली. फूलगळ झाली, की फुलाचे सेटिंग करणे अवघड होते. अनिश्‍चित हवामानामुळे शेवग्याचे उत्पादन कमी येत आहे. सध्या किलोस दोनशे रुपयांहून अधिक दर आहे. गेल्या दहा वर्षांपासून शेवगा शेंगेचे उत्पादन करतो, परंतु इतका दर पहिल्यांदाच मिळत आहे.  - आदिनाथ किणीकर, कोगील बुद्रुक, ता. करवीर, जि. कोल्हापूर

यंदा प्रतिकूल हवामानामुळे मला शेवगा शेंग घेता आली नाही. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये शेवगा शेंग यंदा पहिल्यांदाच किलोस तीनशे रुपयांपर्यंत विकली जात आहे. शेवगा उत्पादनात सातत्य असते. दीडशे रुपयांपर्यंत दर आम्ही घेतला आहे. यंदा दुपटीने दर झाला आहे. मात्र, या दराचा लाभ आम्हास या वर्षी झाला नाही. याची खंत आहे. - सागर खराडे, देवळाली, ता. भूम, जि. उस्मानाबाद  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT