Parbhani News : यावर्षीच्या (२०२५) रब्बी हंगामात जिल्ह्यात ३ लाख ३९ हजार ४१० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. विविध पिकांच्या ६३ हजार ८५७ क्विंटल बियाण्याची गरज असून महाबीज तसेच खाजगी बियाणे उत्पादकांकडे मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली. .परभणी जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या ३ वर्षातील रब्बी हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र २ लाख ७० हजार ८४५ हेक्टर आहे. यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ गृहित धरुन ३ लाख ३९ हजार २०५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आले आहे. .Rabi Sowing: रब्बीतील पेरण्यांना महिनाभर उशीर.त्यात ज्वारी १ लाख हेक्टर, गहू ३५ हजार हेक्टर, मका १ हजार २०० हेक्टर, हरभरा २ लाख हेक्टर, करडई ३ हजार हेक्टर, सूर्यफूल १० हेक्टर, तीळ, जवस १०० हेक्टर, इतर पिके १०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे..जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या तीन वर्षीच्या रब्बी हंगामात सरासरी ६५ हजार ५९० क्विंटल बियाण्याची विक्री झाली. यंदाच्या प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार विविध पिकांच्या ६३ हजार८५७ क्विंटल बियाण्याची मागणी सार्वजनिक क्षेत्रातील व खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे. .Rabi Sowing: खानदेशात रब्बी पेरणी १५ टक्के पूर्ण; शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल.त्यात ज्वारीचे २ हजार ५०० क्विंटल, गव्हाचे १२ हजार ९५० क्विंटल, मक्याचे १८० क्विंटल, हरभऱ्याचे ४८ हजार क्विंटल, करडईच्या २०३ क्विंटल इतर २१ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात महाबीजकडे १६ हजार ८६० क्विंटल बिण्याची मागणी करण्यात आली. .त्यात ज्वारीचे १ हजार ८५० क्विंटल, गव्हाचे २ हजार ४५० क्विंटल, हरभऱ्याचे १२ हजार ५०० क्विंटल, करडईचे १६० क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे २ हजार ४०० क्विंटल बियाण्याची मागणी असून त्यात गव्हाचे ४०० क्विंटल, हरभऱ्याचे २ हजार क्विंटल तर खाजगी कंपन्यांकडे ४४ हजार ५९७ ९ क्विंटल बियाण्याची मागणी केली असून त्यात ज्वारीचे ६५० क्विंटल, गव्हाचे १० हजार १०० क्विंटल,मक्याचे १८० क्विंटल, हरभऱ्याचे ३३ हजार ५०० क्विंटल, करडईचे १४३ क्विंटल इतर पिकांचे २१ क्विंटल बियाणे आहे, असे सामाले यांनी सांगितले..बियाण्याची एकूण मागणीएकूण गरज: ६३,८५७ क्विंटलगेल्या ३ वर्षांची सरासरी विक्री: ६५,५९० क्विंटलएकूण पेरणी प्रस्तावएकूण क्षेत्र ३ लाख ३९ हजार ४१० हेक्टर.गेल्या ३ वर्षांची सरासरी(२०२२-२४) २ लाख ७० हजार ८४५ हेक्टर.यंदा वाढीचे कारण सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध.पिकानुसार प्रस्तावित क्षेत्रफळपीक क्षेत्र (हेक्टर)ज्वारी १,००,०००गहू ३५,०००मका १,२००हरभरा २,००,०००करडई ३,०००सूर्यफूल १०तीळ व जवस १००इतर पिके १००एकूण ३,३९,४१० .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.