Latur News : सोयाबीनची काढणी होताच तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्याच्या विक्रीला प्राधान्य दिले आहे. यातूनच बाजारात सोयाबीनची आवक वाढली असून भाव घसरले आहे. आवक कमी झाल्यानंतर भाव वाढू शकतात. या भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी व त्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने गेली अनेक वर्षापासून शेतीमाल तारण योजना सुरु केली आहे. .यंदा ही योजना सुरु करण्याचा पहिला मान औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळवला असून योजनेत सोयाबीनची साठवणूक करून त्यावर कमी व्याज दराच्या कर्जाचे वाटप सुरु केले आहे. रविवारी (ता. २६) आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ करत बाजार समितीच्या वतीने शेतकरी आदिनाथ नागोराव मोहीते (रा. समदर्गा) व नारायणदास रामप्रसाद बजाज (रा. लामजना) यांना शेतीतारण योजनेतील कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यासोबत बाजार समितीच्या वतीने हमाल बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दीपावलीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे कीट व कपडे तर महिला हमालांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले. .Agricultural Mortgage Loan Scheme : जाणून घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये, अटी व शर्ती.शेतीमाल तारण कर्ज योजना ही शेतकऱ्यांना सन्मानाने त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळेपर्यंत तो सुरक्षित ठेवण्याची संधी देते. ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर शाश्वत आधार असल्याचे सांगत आमदार पवार यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले..या वेळी बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भिमाशंकर राचट्टे, सचिव संतोष हुच्चे, भाजपचे विधानसभा प्रमुख संतोषप्पा मुक्ता, संचालक प्रवीण कोपरकर, प्रकाश काकडे, युवराज बिराजदार, रमाकांत वळके, चंद्रकला झिरमिरे, संतोषी वीर, राधाकृष्ण जाधव, विकास नरहारे, गोविंद भोसले, ईश्वर कुलकर्णी, सुरेश औटी, धनराज जाधव, शंकर पुंड, अडत व खरेदी असोसिएशनचे अध्यक्ष शिवलिंग औटी, उपाध्यक्ष गोविंद दळवे यांच्यासह शेतकरी व हमाल मापाडी उपस्थित होते..Agriculture Mortgage Loan : लासलगाव बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू.बाजार समितीच्या स्वनिधीतून योजनाबाजार समितीने स्वतःच्या निधीतून शेतीमाल तारण योजना हाती घेतली आहे. योजनेत उडीद, मूग, सोयाबीन, तूर, चना तसेच इतर शेतमालाच्या चालू बाजारभावाच्या किंमतीवर ७५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज दरसाल दरशेकडा केवळ सहा टक्के व्याजदराने सहा महिने मुदतीसाठी देण्यात येते. .सहा महिन्यानंतर वाढलेल्या भावाचा लाभ घेत त्याची शेतकऱ्यांना विक्री करता येते. या शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजार समिती सुरक्षितपणे गोदामात साठवून ठेवते. शेतीमाल पावती, सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ देण्यात येतो, असे आमदार पवार यांनी या वेळी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.