Pre-monsoon cotton cultivation started in Aurangabad district
Pre-monsoon cotton cultivation started in Aurangabad district 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड सुरू

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात प्रस्तावित कपाशी लागवड क्षेत्रापैकी मॉन्सूनच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ३२ हजार हेक्टर आहे. गतवर्षी खरीप हंगामात ६ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामुळे कृषी विभागाकडून येत्या खरीप हंगामासाठी ७ लाख १६ हजार हेक्टर पेरणी प्रस्तावित करण्यात आली. त्यात ४ लाख ५ हजार हेक्‍टरवर कपाशी, १ लाख ८२ हजार हेक्‍टरवर मका, ४५ हजार हेक्‍टरवर तूर, ३१ हजार हेक्‍टरवर बाजरीचा समावेश आहे. 

यंदा कडधान्याचे क्षेत्र ६४ हजार हेक्‍टर प्रस्तावित आहे. त्यास अनुसरून शेतकऱ्यांनी बियाणे व खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू केली. पैठण, सोयगाव, सिल्लोड तालुक्यात काही ठिकाणी कपाशीच्या मान्सूनपूर्व लागवडीसह आले लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्यात कपाशीच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रासाठी २० लाख कपाशी बियाणे पाकिटांची आवश्यकता नोंदविली गेली होती. त्या तुलनेत १७ लाख ८६ हजार कपाशी बियाणे पाकिटे उपलब्ध आहेत. मक्याच्या पेरणी खालील क्षेत्रासाठी २७ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता होती. त्या तुलनेत २६ हजार ८३३ क्विंटल मका बियाणे पुरविले आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले.  ७० हजार ८८७ टन खते उपलब्ध 

औरंगाबाद जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख १ हजार ७६९ मेट्रिक टन इतका आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ३३ हजार ९१० मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर आहे. शिवाय ६६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा रब्बी हंगामानंतर जिल्ह्यात शिल्लक होता. मंजूर खत आवंटनाच्या तुलनेत ७० हजार ८८७ मेट्रिक टन रासायनिक खत एप्रिलपासून १ मे पर्यंत जिल्ह्यात उपलब्ध केले आहे, अशी माहिती गंजेवार यांनी दिली. उपलब्ध खतांपैकी ७३ हजार ७५४ मेट्रिक टन रासायनिक खतांची विक्री झाली. एक मे अखेर जिल्ह्यात ४७३५ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध होते, असेही गंजेवार यांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT