प्रताप होगाडे
प्रताप होगाडे 
मुख्य बातम्या

कृषी संजीवनीतील त्रुटींबाबत तक्रार अर्ज दाखल करा : होगाडे

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: कृषी संजीवनी योजनेच्या त्रुटींबाबत राज्यातील वीज ग्राहक संघटना, कृषी ग्राहक शेतकरी संघटना व संबंधितांनी तक्रार अर्ज दाखल करण्याची मोहीम सुरू करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे.  शासनाने जाहीर केलेल्या नव्या कृषी संजीवनी योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी या तक्रारी दाखल करणे आवश्‍यक असल्याचे श्री. होगाडे यांनी म्हटले आहे. नव्या योजनेत अंदाजे ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या वीजबिलातील थकबाकी चुकीची आहे. वाढीव जोडभार अथवा वाढीव युनिटस या आधारे थकबाकी अवाजवी फुगविली आहे.  कंपनीचे बिल शंभर युनिटचे होते. तेव्हा कंपनीचा प्रत्यक्ष वीज पुरवठा ६० युनिट अथवा कमी असतो. याचाच अर्थ वीजबिल १०० रुपये असते. त्यावेळी खरे देणे ६० रुपये असते. त्यामुळे मार्च २०१७ अखेरची खरी थकबाकी निश्‍चित होणे आवश्‍यक असते. तसेच एप्रिल २०१७ पासूनची चालू बिलेही दुरुस्त होणेही आवश्‍यक आहे. मार्च २०१६ अखेर संपलेल्या कृषी संजीवनी योजनेमध्ये थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात आली होती. ती आता काढून टाकली आहे. ती सूट पुन्हा लागू होणे आवश्‍यक आहे. वरीलप्रमाणे हिशेब केल्यास १०० रुपये थकीत मुद्दल बिलातील खरी थकबाकी ६० रुपये निश्‍चित होइल व ५० टक्के सूट लागू केल्यास तीस रुपये भरावे लागतील. सध्या मात्र शंभर रुपये थकबाकी मान्य करा व पहिला हप्ता भरा अन्यथा वीज तोडू, अशी जाहिरात व अंमलबजावणी सुरू आहे. याचाच अर्थ शेतकरी ग्राहकावर ३० रुपये वसुली योग्य असताना अन्याय शंभर रुपयांची वसुली लादली जात आहे. या विरोधात चळवळ आवश्‍यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने तक्रार अर्ज एक महिन्याच्या आत वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये दाखल करावेत व त्याची पोच महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT