Possibility of rain exposure in the state
Possibility of rain exposure in the state 
मुख्य बातम्या

राज्यात पावसाची उघडीप शक्य

टीम अॅग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवासात विदर्भाच्या काही भागातून निरोप घेतला आहे. यातच राज्यात सुरू असलेल्या वादळी पाऊस विश्रांती घेणार असल्याने आजपासून (ता. १२) बहुतांशी भागात उघडीप मिळण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत (ता. १३) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ठळक कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवार पर्यंत (ता. १५) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि त्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र कोकणाच्या काही भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT