भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची शक्यता
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची शक्यता 
मुख्य बातम्या

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची शक्यता

टीम अॅग्रोवन

भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात पावसाने दडी मारली आहे. आठ दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या हातात केवळ तणसच राहण्याची भीती वर्तविली जात आहे. धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात यामुळे शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.

भंडारा जिल्ह्यात यावर्षी १ लाख ७४ हजार हेक्‍टरवर धानाची रोवणी करण्यात आली. त्यासाठी सहा जूनपासून पऱ्हे फेकण्यात आले. त्यानंतर १४ ते ३० जूनपर्यंत ७५ टक्‍के रोवणीची कामे पूर्णत्वास गेली. यानंतर पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने रोवणीचे काम प्रभावित झाले होते. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सद्या उच्च प्रतीचे धान गर्भार अवस्थेत, तर निम्न प्रतीचे धान पीक नासवले आहे. या अवस्थेत पिकाला पाण्याची आवश्‍यकता आहे. परंतु, तब्बल २० दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने धान उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ऊन वाढल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. धानपीक कोमजले असून येत्या चार दिवसांत पाऊस न बरसल्यास निसवलेले धान भरणार नाही. गर्भार अवस्थेतील धान लोंब्या फेकणार नाही. भात पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचाही उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

डिझेल दरवाढीचाही फटका काही शेतकऱ्यांकडे ओलिताच्या सोयी आहेत. परंतु, भारनियमनामुळे पाणी उपसा करता येत नाही. त्यातच डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने डिझेलपंपाच्या वापरावरदेखील मर्यादा आल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT