डाळींब
डाळींब  
मुख्य बातम्या

बाजारात डाळिंबाचे दर दबावात

Abhijeet Dake

सांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला प्रतिकिलोस ९० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षीर्पेक्षा यंदाच्या हंगामात डाळिंबाला १० ते १५ रुपये प्रतिकिलोस दर कमी मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  देशात सुमारे अडीच लाख हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. बाजारात हस्त आणि मृग हंगामातील डाळिंब आले आहे. यंदा कमी अधिक पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी टॅकरने पाणी देऊन बागा जगवल्या आहेत. डाळिंबाला अधिक दर मिळतील अशी आशा होती. गेल्यावर्षी स्थानिक बाजारपेठेत डाळिंबाला ३५ ते ५५ रुपये असे दर मिळाले होते. तर निर्यातक्षम डाळिंबाला ११० ते १५० रुपये प्रतिकिलो असा दर भेटला होता. मात्र देशात गतवर्षीपेक्षा डाळिंबाच्या उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी उत्पादन वाढले आहे. उत्पादन वाढीचा फटका डाळिंबाच्या दरावर झाला आहे. परिमाणी डाळिंब उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. 

प्रक्रिया उद्योगासाठी द्यावी मदत ज्यापद्धतीने आंबा, स्ट्रॉबेरी या फळांवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासन पुढाकार घेतात. त्याच धर्तीवर डाळिंबावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी शासनाने उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण आणि अनुदान द्यावेत. डाळिंबावर प्रक्रिया सुरू झाले तर नक्कीच डाळिंबाला अपेक्षित दर मिळतील. 

क्षेत्रात वाढ  राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतील शेतकरी डाळिंब लागवडीसाठी पुढे येऊ लागले आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यांत डाळिंबाच्या क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत ५० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. या राज्यातील डाळिंब नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विक्रीला येतात. उत्पादन अधिक झाल्याने डाळिंबाला मागणी कमी असल्याने दर कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निर्यातही घटली रेसिड्यू फ्री डाळिंबाला परदेशात मागणी आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढे आले. मात्र, इतर परदेशातील डाळिंब बाजारपेठेत कमी दरात मिळू लागली आहेत. त्यामुळे देशातील डाळिंबाची मागणी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये सुमारे १० ते १५ टक्क्यांनी निर्यात घटली असा अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.   प्रतिक्रिया

डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. तरच डाळिंबाला अपेक्षित दर मिळतील. - शकील काझी, भाळवणी, ता.  पंढरपूर, जि.  सोलापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT