खानदेशात पावसाची टक्केवारी वाढतीच
खानदेशात पावसाची टक्केवारी वाढतीच 
मुख्य बातम्या

खानदेशात पावसाची टक्केवारी वाढतीच

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात मागील वर्षाच्या तुलनेत पाऊसमान चांगले असून, पावसाळा संपण्यास आणखी ४३ दिवस अधिकृतपणे राहिले आहेत. यादरम्यान टप्प्याटप्प्यात पावसाने हजेरी लावली तर पाऊस १०० टक्‍क्‍यांवर जाईल. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६७ टक्के, धुळ्यात ६४ टक्के आणि नंदुरबारात १५८ टक्के पाऊस झाल्याची माहिती आहे.  नंदुरबारात मागील पंधरवड्यात अतिवृष्टी झाली. नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, खर्डी, कन्हेरी, सुसरी, गोमाई आदी सर्वच नद्यांना पूर आले. नंदुरबारमधील पूरस्थिती ओसरली आहे. मागील वर्षी नंदुरबारात ऑगस्टच्या मध्यापर्यंत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नव्हता. नंदुरबार, शहादामध्ये दुष्काळी स्थिती होती. मिरची पिकाला नंदुरबार तालुक्‍यातील कोठली, पाचोराबारी, पळाशी, धमडाई, पथराई, कोळदे, लहान शहादे आदी भागात मोठा फटका बसला होता. धुळ्यात शिरपूर व साक्रीमधील काही महसूल मंडळे वगळता अतिवृष्टी झाली नाही. साक्री भागातील जोरदार पावसामुळे पांझरा नदीला पूर आला होता. धुळे जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टअखेर ५० टक्केही पाऊस झाला नव्हता.  जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ६५ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी ऑगस्टच्या मध्यातच ६७ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ७६५ मिलिमीटर, धुळ्यात ९२५ आणि नंदुरबारात सुमारे ११०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. यावर्षी पाऊसमान बरे असल्याने पावसाची टक्केवारी वाढत आहे. मागील दोन दिवसांतही धुळे, नंदुरबार व जळगावमधील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात शनिवारी सकाळी आठपर्यंत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, जामनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, रावेर येथे पावसाने हजेरी लावली. पावसाळा संपण्यास आणखी ४३ दिवस अधिकृतपणे राहिले आहेत. यादरम्यान पाऊसमान व्यवस्थित राहिले तर सरासरी १०० टक्‍क्‍यांवर जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT