शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला गंडा
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला गंडा 
मुख्य बातम्या

शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला गंडा

टीम अॅग्रोवन

वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील जनावरे वाटप योजनेचा लाभ मिळवून देण्याची बतावणी करीत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शिपायाने १४ शेतकऱ्यांना २२ लाखांचा गंडा घातला. फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली.  आष्टी शहीद तालुक्‍याच्या पार्डी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नंदकिशोर गुरनुले हा शिपाई आहे. त्याने शासकीय योजनेतून ७५ टक्‍क्‍के अनुदानावर जनावरे मिळवून देण्याची बतावणी शेतकऱ्यांना केली. शेतकऱ्यांनी त्याच्या बोलवण्यावर विश्‍वास ठेवत त्याने सांगितलेले दस्तऐवज आणून दिले. शासनाकडून ६ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळेल याची हमी दिल्यावर ८ लाखांच्या योजनेमधील १ लाख ५० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. पैशाची जुळवाजुळव करून ते नंदकिशोर याला दिल्यावर त्यांनी पावती फाडली. मूळ कॉपी सोबत घेऊन गेला. झेरॉक्‍स देतो म्हणून सांगत होता. परंतु पावती दिलीच नाही. तो सर्व शेतकऱ्यांना मी डॉक्‍टर आहे, अशी बतावणी करीत होता. त्यामुळे एकापाठोपाठ एका  शेतकऱ्याने पैसे भरले. नंतर तो डॉक्‍टर नसून शिपाई असल्याचा खुलासा झाल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिस तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे शिपाई नंदकिशोर गुरुनुले याच्यावर यापूर्वी देखील अशाप्रकारच्या फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. निलंबनानंतर अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्याची हिंमत वाढल्याचे सांगीतले जाते. याप्रकरणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा गुल्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.  अनुदान होते खात्यात जमा गायी, म्हैस अनुदानावर देण्याची पशुसंवर्धन खात्याची योजना आहे. त्याकरिता ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचे आहेत. अनुदानदेखील खात्यात जमा होते. त्याकरिता असलेल्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. या शेतकऱ्यांची झाली फसवणूक :  गजानन अडसड  (रा. साहूर), दामोदर पांडे (रा. सत्तरपूर), रामदास ठाकरे (रा. धाडी), साहेबराव चोरे (रा. धाडी), मुकर ठाकरे (रा), पापडकर (रा. धाडी), अनिल काळे (रा. वर्धपूर), गोवर्धन पोटे (रा. सलरपूर), किशोर पापडकर (रा. धाडी), अरुण अडसड (रा. साहूर), सागर रत्नपारखी (रा. साहूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT