Pay the overdue amount of sugarcane from KGS factory on Diwali 
मुख्य बातम्या

दिवाळीत केजीएस कारखान्याकडील उसाची थकीत रक्कम द्या

निफाड, जि. नाशिक : निफाड तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिवाळीत थकीत रक्कम द्या, अन्यथा आत्महत्येस परवानगी द्या, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदारांनी केली.

टीम अॅग्रोवन

निफाड, जि. नाशिक : ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे केजीएस कारखान्याकडील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदारांचे थकबाकी पेमेंट व्याजासह तत्काळ दिवाळीपूर्वी मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता.२)आक्रोश मोर्चा काढण्यात आला. निफाड तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिवाळीत थकीत रक्कम द्या, अन्यथा आत्महत्येस परवानगी द्या, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदारांनी केली.

निफाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून आक्रोश मोर्चाला सुरवात झाली. सुधाकर मोगल, संजय पाटोळे, भाऊसाहेब तासकर, निवृती गारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करून अशी ऐकमुखी मागणी करण्यात आली. पैसे मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने जाहीर करण्यात आले. 

यावेळी शेतकरी संघर्ष संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, निफाड, नाशिक, सिन्नर, वैजापूर, गंगापूर, इगतपुरी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या मान्य करण्यासंबंधी घोषणा दिल्या.

केजीएस साखर कारखान्याला ऊस दिला; परंतु पैसे मिळाले नाहीत. घरात मुलीचे लग्न असताना पत्रिका घेऊन संबधितांकडे गेलो. तरी त्यांना माझी कीव आली नाही. शासनाने आता लक्ष घालून आमच्या पैशाची सोय करावी - पंडित पावडे, ऊस उत्पादक, चापडगाव, ता. निफाड   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT