एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी पूर्ण
एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी पूर्ण 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता.३१)पर्यंत अनुक्रमे ५७ हजार ४३६ हेक्टरवर (२०.७१ टक्के) आणि ५० हजार १४ हेक्टर (३९.६० टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण १ लाख ७ हजार ४५० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. दोनही जिल्ह्यांत करडईचा पेरा घटला आहे. हिंगोली जिल्ह्यात हरभराच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात गव्हाची पेरणी सुरू झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात रब्बी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख २७ लाख ३६७ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक १ लाख ५९ हजार ७३ हेक्टर आहे. गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार ६४ हेक्टर, करडई २५ हजार २०९ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. मंगळवार (ता.३१) पर्यंत ज्वारीची ३७ हजार ८१७ हेक्टर, गव्हाची ३२ हेक्टर, हरभऱ्याची १८ हजार ४५२ हेक्टर, करडईची ७५२ हेक्टर, रब्बी मक्याची ३६३ हेक्टर अशी एकूण ५७ हजार ४३६ हेक्टरवर म्हणजेच २०.७१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.  यंदा करडई या तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्रात मोठी घट झाली असून ७५२ हेक्टर म्हणजेच केवळ २.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाची पेरणी नुकतीच सुरू झाली आहे. परभणी तालुक्यात १ हजार ७१० हेक्टर, जिंतूर तालुक्यामध्ये १० हजार २९० हेक्टर, सेलू तालुक्यात १५ हजार ९७० हेक्टर, मानवत तालुक्यात ७ हजार ८० हेक्टर, पाथरी तालुक्यात ३ हजार ६५९ हेक्टर, सोनपेठ तालुक्यात ६ हजार १५२ हेक्टर, गंगाखेड तालुक्यात ४ हजार ९५० हेक्टर, पालम तालुक्यामध्ये १ हजार ८२६ हेक्टर, पूर्णा तालुक्यामध्ये ५ हजार ७९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर पेरणी... जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २६ हजार २९० हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी २२ हजार ८१० हेक्टर, गहू ३२ हजार ५४० हेक्टर, हरभरा ३५ हजार ३६० हेक्टर, करडई २७ हजार ९७० हेक्टर, जवस ४९० हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश मंगळवार (ता.३१) पर्यंत ५० हजार ११ हेक्टरवर (३९.६० टक्के) पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारी ४ हजार ४५८ हेक्टर, गहू २ हजार ८५३ हेक्टर, हरभरा ४२ हजार ६६ हेक्टर, करडई २६४ हेक्टर, जवस ५० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. करडईच्या क्षेत्रात मोठी घट झाली असून फक्त ०.९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या ११८.९६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा अनेक भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन काढणीस उशीर झाला. रान तयार नसल्यामुळे रबीच्या पेरणीस उशीर झाला आहे. मूग,उडिदाच्या तसेच खरिपामध्ये नापेर राहिलेल्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT