पांझरा, हतनूरचे पाणी सोडा, शेतकऱ्यांची मागणी
पांझरा, हतनूरचे पाणी सोडा, शेतकऱ्यांची मागणी 
मुख्य बातम्या

पांझरा, हतनूरचे पाणी सोडा, शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

जळगाव : पाणीटंचाई वाढत असल्याने तापीनदीसह पांझरा नदीवरील प्रकल्पांमधून नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. धुळ्यासह अमळनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील अनेक गावांची तहान भागविण्याची क्षमता असलेल्या पांझरा, तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

पांझरा प्रकल्प हा धुळ्यासाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास धुळे जिल्ह्यातील १६ पेक्षा अधिक गावांना लाभ मिळेल. त्यात प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील भदाणे, खंडलाय बुद्रुक, खंडलाय खुर्द, बांबुर्ले, शिरधाने, कावठी, मेहेरगाव, नवलाणे, नेर कानडामाना शिवार, निमडाळे, वार, कुसुंबा, अकलाड, मोराणे, कुंडाणे, गोंदूर, सुट्रेपाडा, आनंदखेडे आदी गावांमधून पाण्याची मध्यंतरी मागणी करण्यात आली.

बेटावद, कापडणे, कौठळ, मोहाडी, हेंकळवाडी भागातूनही नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात होती. फेब्रुवारीमध्ये शिंदखेडा, धुळे व अमळनेर तालुक्‍यांतील सुमारे ४० गावांमधील पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी पांझरा नदीत पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. हा भाग मुरमाड व हलक्‍या जमिनीचा आहे. यामुळे पाण्याचे स्त्रोत लागलीच आटतात. यामुळे टंचाई वाढत आहे.

तापी नदीवरील मुक्ताईनगर तालुक्‍यानजीकच्या हतनूर प्रकल्पातूनही पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु, शेतीसाठी पाणीच सोडले नाही. आता उद्योग व पिण्याच्या पाण्यासाठी हतनूरमधील जलसाठा आरक्षित आहे. परंतु नदीत पाणी येत नाही. फक्त भुसावळपर्यंत हे पाणी येते. ते पुढे शेळगाव बॅरेज, भोकर, चोपड्यातील कठोरा, अमळनेरातील कलाली, कपिलेश्‍वरपर्यंत सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण तापीनदीमधील सर्व डोह आटण्याच्या स्थितीत आहेत. अमळनेर, चोपडा भागात पाण्याचे संकट वाढत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT