खतांची दरवाढ मागे घेण्याची शेतकऱ्यांसह संघटनांची मागणी
खतांची दरवाढ मागे घेण्याची शेतकऱ्यांसह संघटनांची मागणी 
मुख्य बातम्या

खतांची दरवाढ मागे घेण्याची शेतकऱ्यांसह संघटनांची मागणी

टीम अॅग्रोवन

जळगाव : रासायनिक खतांचा वापर कमी होत आहे. परंतु, त्याच्या किमती मात्र वर्षागणिक वाढत असून, वर्षभरात संयुक्त व सरळ खतांच्या किमतीमध्ये किमान १५० ते २७० रुपयांनी गोणीमागे वाढ झाली आहे. ही दरवाढ मागे घेतली जावी, अशी मागणी शेतकरी व संघटनांनी केली आहे.  युरियाचे दर मागील हंगामात किंवा मे २०१८ मध्ये २६५ रुपयांपर्यंत होते. तेव्हा ५० किलोची गोणी मिळायची. आता ४५ किलोची युरियाची गोणी २६२ रुपयांना मिळते. १२.३२.१६, डीएपी, पोटॅश, १०.२६.२६, २०.२०.१४ या खतांच्या दरातही वाढ झाली आहे. १३०० रुपयांवर संयुक्त खतांचे दर पोचले आहेत. पोटॅश, युरिया ही सरळ खते लहान शेतकरी खरिपात वापरतात. दुष्काळामुळे मागील हंगामात हाती अपवादानेच आला.  आता पुढील हंगामासाठी महागाई वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे. डीएपीचे दर १४५० रुपये प्रतिगोणीपर्यंत आहेत. तर १२.३२.१६ चे दरही १३०० रुपयांवर आहेत. एक गोणी खरेदी करताना लहान शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांना करावाच लागतो. कारण १०० टक्के सेंद्रीय शेती अपवादानेच केली जाते. मजुरीचे दर वाढले आहेत. शेतमालाचे दर आता वधारलेले दिसत असले तरी जेव्हा शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल आला होता, तेव्हा मक्‍याचे दर १५००, कापसाचे दर ५००० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल असे होते.  ज्वारी, बाजरीची खरेदी कवडीमोल दरात व्यापाऱ्यांनी मागील नोव्हेंबरमध्ये केली. खतांसोबत बियाणे पुढे घ्यावे लागेल. यामुळे खतांची दरवाढ केंद्राने मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे आत्माराम बळिराम पाटील (कापडणे, जि. धुळे) व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT