शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची प्रायोगिक योजना
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची प्रायोगिक योजना 
मुख्य बातम्या

शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची प्रायोगिक योजना

टीम अॅग्रोवन

मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाइन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  श्री. पाटील म्हणाले, ही नावीन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी प्रथमतः राबविण्यात येत आहे. यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते, ही वखार पावती वखार अधिनियम, १९६० नुसार पराक्रम्य (Negotiable) असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते. वखार पावतीवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाइन पद्धतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करून कर्ज प्राप्त करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल. यामध्ये ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचे बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्य साठा या सर्व गोष्टी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाइन होणार असल्याने शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे. आणि ऑनलाइन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. अशी असेल कर्ज प्रक्रिया..

  • शेतकऱ्यांना यासंबंधीचे मोबाईल ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल
  • स्मार्टफोनच्या आधारे मराठीमध्ये अर्ज करता येईल
  • मोबाईलवरच आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पाठविता येतील
  • अर्ज केल्यानंतर बँकेकडून छाननी केली जाईल 
  • वखार पावतीवरील शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज बँक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल 
  • कर्ज सुविधा एक ते दोन दिवसात उपलब्ध करून दिली जाईल 
  • तारण कर्जाचे व्याजदर ९ टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत कमी आहे
  • तारण कर्जाची कमाल मर्यादा ५ लाख प्रति शेतकरी एवढी असेल
  • वखार महामंडळाकडून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यात ५० टक्के सवलत
  • वेळोवेळी कर्जाची रक्कम व व्याजाची माहिती शेतकऱ्यांस मोबाईलवर मिळेल
  • शेतमाल विक्री वेळेस बँकेचे मुद्दल व व्याज ऑनलाइन भरणा केल्यावर शेतकऱ्याच्या वखार पावतीवरील बोजा कमी करण्यात येईल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT