कांदा लागवड
कांदा लागवड 
मुख्य बातम्या

कांदा लागवडीत शिरूरची बाजी

टीम अॅग्रोवन

पुणे ः कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक लागवड शिरूर तालुक्यात झाली आहे. त्यामुळे कांदा लागवडीत शिरूर तालुका जिल्ह्यात मुख्य आगार म्हणून पुढे येत आहे. सध्या रब्बी हंगामात कांद्याची लागवड वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात ४३ हजार ५७० हेक्टरपैकी एकट्या शिरूरमध्ये १३ हजार ६४० हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यातील पूर्वेकडील शिरूर, खेड, बारामती, पुरंदर, दौंड या तालुक्यात दरवर्षी कमी पाऊस पडतो. त्यामुळे बहुतांशी शेतकरी कमी कालावधीची व शाश्वत उत्पन्न देणारी पिके घेत आहेत. रब्बी हंगामात अनेक शेतकरी गहू पिकाएेवजी कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यामुळे शिरूर, खेड, बारामती, पुरंदर, दौंड हे तालुके कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध झाले आहेत. या भागातील सर्वाधिक लागवड शिरूर तालक्यात होते. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगले दर असल्याने तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळू लागले आहेत. तालुक्यातील टाकळीहाजी, पिंपरखेड, काठापूर, मांडवगण, तांदळी, गणेगाव, बाभूळसर, पिपळसुपी, जांबूत, वडनेर, कौठे, कान्हूर, चिंचोरी ही गावे कांदा लागवडीचे मुख्य आगार म्हणून ओळखली जातात. यंदाही या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  दरवर्षी खरीप, लेट खरीप (रांगडा कांदा) आणि रब्बी हंगामात (उन्हाळी कांदा) कांद्याची लागवड होते. बहुतांशी शेतकरी रब्बी हंगामातील कांद्याला अधिक प्राधान्य देतात. खरीप हंगामातील कांद्याची आॅगस्टमध्ये लागवड होते. लेट खरीप हंगातील कांद्याची सप्टेंबर ते आॅक्टोबर या महिन्यात लागवड करतात. उन्हाळी कांद्याची डिसेंबर, जानेवारी महिन्यात लागवड होते. त्यासाठी बहुतांशी शेतकरी एक ते दीड महिना अगोदर गादीवाफ्यावर रोपे तयार करून त्यानंतर लागवड करतात.  लागवड केलेल्या कांद्याची साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनी काढणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो; परंतु काही शेतकरी कांद्याची साठवणूक करतात. चांगला भाव आल्यानंतर त्याची विक्री करतात. परिणामी शेतकऱ्यांना हंगामात भेटणाऱ्या दरापेक्षा अधिक दर नंतरच्या कालावधीत मिळतो. तसेच या भागात हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवडी करतात, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  तालुकानिहाय झालेली कांदा लागवड ः (क्षेत्र, हेक्टरमध्ये) हवेली १९००, मुळशी १८०, भोर ४९०, मावळ २००, वेल्हा ३०, जुन्नर ६१५०, खेड ५७००, आंबेगाव ३१५०, शिरूर १३६४०, बारामती ३५८०, इंदापूर ५६०, दौंड ३७८०, पुरंदर ४२१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT