पावसामुळे कांदा लागवड अडचणीत आली आहे
पावसामुळे कांदा लागवड अडचणीत आली आहे 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे कांदा लागवड अडचणीत

टीम अॅग्रोवन

नाशिक  : जिल्ह्यात चालू वर्षी खरीप कांदा लागवडीचा कालावधी थोडा पुढे गेला आहे. या आठवड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे खरिपातील कांदा लागवड अडचणीत आली आहे. 

जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, निफाड व येवला या तालुक्यांमधील कांदा लागवडीला पावसामुळे फटका बसला आहे, तसेच लागवडी विरळ होत आहेत. त्यामुळे जर असाच पाऊस राहिला तर लागवडी पूर्णपणे अडचणीत येण्याची शक्यता कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.  मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे या पावसामुळे कांद्याच्या वाफ्यांमध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबर महिन्यातील नवीन लागवडींना मोठा फटका बसला आहे. या लागवडीची रोपे पिवळी पडत असून, रोपांच्या मुळ्या सडून जात आहेत. परिणामी खरीप लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या आहेत प्रमुख अडचणी 

  • नवीन लागवडीमधील रोपे पिवळी पडत आहेत. 
  • रोपांच्या मुळ्या सडत असल्याने वाढीच्या अवस्थेत अडचणी
  • कांदे पिवळे पडत करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता 
  • हुमणीमुळे पिकांचे नुकसान होत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

    Govind Hande : अविरत कर्मयोगी

    Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    SCROLL FOR NEXT