onion
onion  
मुख्य बातम्या

ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८० रुपये दर 

टीम अॅग्रोवन

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या ओतूर उपबाजारात रविवारी (ता.१८) कांद्याला दहा किलोला सर्वाधिक ८२१ रुपये दर मिळाल्याचा उच्चांक झाला आहे. ओतूर उपबाजारात २१ हजार ८०१ पिशव्या कांद्याची आवक झाली होती. यावेळी सर्वोत्तम कांद्याला ८२१ रुपये दर मिळाला तर सरासरी दर ६०० रुपये मिळाल्याची माहिती बाजार समिती सभापती संजय काळे यांनी दिली. 

यंदा सततच्या पावसाचा फटका कांदा पिकाला बसला असून, कांदा लागवडी दरम्यान झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कांदा रोपवाटीकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे कांद्याच्या लागवडीमध्ये घट झाली असून, चाळींमधील कांदा देखील मोठ्या प्रमाणावर भिजल्याने कांद्याची बाजारामधील आवक घटत गेली, परिणामी कांदा टंचाई निर्माण झाल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. तसेच नवीन कांद्याच्या आवकेला देखील आणखी दोन महिन्यांचा विलंब असणार असल्याने कांद्याची दर चढेच राहण्याचा अंदाज काळे व्यक्त केला आहे. 

दरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील रविवारी (ता.१८) कांद्याचे दर दहा किलोला ६३० रुपयांपर्यंत वाढले होते. बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची अवघी ३०० गोणी आवक झाली होती.तर नवीन कांद्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. यावेळी नवीन कांद्याला दहा किलोला ३०० ते ५००तर जुन्या कांद्याला ५०० ते ६३० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.  ओतुर उपबाजारात मिळालेला दर 

१ नंबर ७०० ते ७५० 
२ नंबर ५५० ते ७०० 
३ नंबर ४०० ते ५५० 
४ नंबर २०० ते ४०० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT