Onion buying and selling closed at Parner Market Committee
Onion buying and selling closed at Parner Market Committee 
मुख्य बातम्या

पारनेर बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री बंद

टीम अॅग्रोवन

नगर ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार नऊ मेपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पारनेर बाजार समितीने तसे जाहीर केले आहे.

नगर जिल्ह्यात, पारनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन व राज्यात लॉकडाउन झाल्यानंतर बाजार समितीमधील कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले होते. त्यानंतर पणन संचालनालयाने नियम व अटींचे पालन करून हे व्यवहार पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बाजार समितीने एक मेपासून कांदा खरेदी-विक्री व्यवहार सुरू केले होते. मात्र पारनेर शहरासह तालुक्‍यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, बाजार समितीत काम करणाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे व्यवहार करणे कठीण होत आहे. याचा विचार करून व्यापारी असोसिएशनच्या वतीने बैठक घेऊन, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नऊ मेपासून व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी, कामगार, मजूर, हमाल, व्यापारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय झाला असला, तरी लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येऊन खरेदी- विक्री सुरळीत सुरू होईल. बाजार समितीने कायम शेतकरी, कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे, असे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. कोरोनामुळे आतापर्यंत नगर, घोडेगाव, पारनेर बाजार समित्यांत व्यवहार बंद आहे. कडक लॉकडाउन काळातही लोक बाहेर पडत असल्याने रुग्ण कमी होइनात त्यामुळे महापालिका आयुक्‍तांनी पुन्हा कडक लॉकडाउन लागू केला आहे.

जिल्ह्यात अजून पाच दिवस कडक लॉकडाउन नगर शहर व जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या कमी व्हायला तयार नाही. दररोज चार ते पाच हजार रुग्णसंख्येत भर पडत असल्याने महापालिकेने सात दिवसांचा कडक लॉकडाउन केला होता. त्यात आता पुन्हा पाच दिवसाची भर घालण्यात आली आहे. आता १५ मे पर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे. भाजीपाला, फळे विक्रीला घाललेली बंदी कायम आहे. महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी सोमवारी (ता. १०) रात्री पुन्हा नव्याने आदेश काढण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT