कांदा लिलाव
कांदा लिलाव  
मुख्य बातम्या

कांदा लिलाव आजपासून सुरु

ज्ञानेश उगले

नाशिक : आयकर खात्याचे छापे, केंद्राकडून जाहीर झालेली स्टॉक लिमिटची बंधने या पार्श्‍वभूमीवर कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद रविवारी (ता. १७) मागे घेतला आहे. आज (सोमवार, ता. १८) पासून जिल्ह्यातील कांद्याच्या सर्व बाजार समित्यांत लिलाव सुरू होणार आहे.

मागील महिन्यात केंद्राने राज्य सरकारला कांदा व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट घालण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. दरम्यान, गत सप्ताहात प्राप्तिकर विभागाकडून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून लिलावात सहभागी होण्यास नकार दिला. केंद्र शासनाच्या भूमिकेविरुद्ध बेमुदत बंद पुकारण्याचेही व्यापाऱ्यांच्या संघटनेने जाहीर केले.

या पार्श्‍वभूमीवर दरात उतरण होऊन त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. या पार्श्‍वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी रविवारी (ता. १७) संबंधितांची तातडीने बैठक बोलावली. त्यांनी व्यापाऱ्यांना कांदा लिलाव सुरू करण्याबाबत आवाहन केले.

या वेळी स्टॉक लिमिटच्या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत यामुळे कांदा व्यापार संकटात येईल, असे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी "अद्याप अशापर्यंतचा निर्णय झाला नसून, व्यापाऱ्यांच्या सूचना शासनापर्यंत पोचविण्यात येतील, असे सांगितले. या वेळी बंद मागे घेत असल्याचे व्यापारी संघटनेकडून जाहीर करण्यात आले.

बैठकीस नाशिक जिल्हा कांदा बटाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्यासह असोसिएशनचे जिल्ह्यातील व्यापारी सदस्य, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा उपनिबंधक निळकंठ कऱ्हे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT