सोलापूर बाजार समितीत कांद्याची उच्चांकी आवक
सोलापूर बाजार समितीत कांद्याची उच्चांकी आवक 
मुख्य बातम्या

सोलापूर बाजार समितीत कांद्याची उच्चांकी आवक

टीम अॅग्रोवन

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.16) बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला. बाजार समितीमध्ये एकाचदिवशी तब्बल 509 ट्रकमधून (50 हजार 961 क्विंटल) कांद्याची आवक झाली़, पण आवक वाढूनही दर मात्र कमाल 4000 रुपये प्रतिक्विंटलवर राहिला.

बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी ही माहिती दिली़. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढते आहे, पण उठाव चांगला असल्याने दरही टिकून आहे. शनिवारी 4 हजार रुपये दराने 27 क्विंटल तर 2000 रुपये दराने 13 क्विंटल आणि 2225 रुपये या सरासरी दराने 50 हजार 921 क्विंटल कांदा विक्री झाला. सोलापूर बाजार समितीत जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी यासह मराठवाड्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड आदी परिसरांतून कांद्याची आवक होत आहे. बाजार समिती प्रशासनाच्या सोईसुविधा, रोख व्यवहार यामुळेच ही उलाढाल वाढत असल्याचे प्रशासक श्री. काकडे यांनी सांगितले. दरम्यान, या माध्यमातून एकाच दिवसात तब्बल 11 कोटी 33 लाख 88 हजार 225 रुपये 3000 हजार शेतकऱ्यांना मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

आवक, उलाढालीचा आलेख वाढताच पंधरा दिवसांपूर्वी 28 नोव्हेंबरला 426 ट्रकमधून 42 हजार 611 क्विंटल कांदा आला होता. त्यादिवशीही 10 कोटी 97 लाख 23 हजार 325 रुपयांची उलाढाल झाली होती. त्या वेळी कमाल 200 आणि किमान 5000 तर सरासरी 2575 भाव मिळाला. आवकेचा हा विक्रम आज मोडला आहे, असे सचिव विनोद पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT