परभणीत महाबीजकडून एक लाख क्विंटल बियाणे पुरवठा
परभणीत महाबीजकडून एक लाख क्विंटल बियाणे पुरवठा 
मुख्य बातम्या

परभणीत महाबीजकडून एक लाख क्विंटल बियाणे पुरवठा

टीम अॅग्रोवन

परभणी ः महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या १ लाख १४ हजार ९७८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी दिली.

यंदा खरिपासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे उत्पादक महामंडळाच्या (महाबीज) परभणी विभागांतर्गतच्या सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या १ लाख ४ हजार २५९ क्विंटल तसेच अन्य पिकांच्या १० हजा ७१९ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) अंतर्गत मूग, उडीद, तूर पिकांच्या प्रात्यक्षिक वितरणासाठी १० वर्षाच्या आतील वाणास प्रतिकिलो ५० रुपये, तसेच १० वर्षाच्या वरील वाणास प्रतिकिलो २५ रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान वजा करता १० वर्षांखालील मुगाच्या वाणांच्या बियाण्याची किंमत प्रतिकिलो ६० रुपये, उडदाचे ५३ रुपये, तुरीचे ५७ रुपये तर १० वर्षांवरील मुगाच्या वाणांचे बियाणे ८५ रुपये, उडदाचे ९५ रुपये, तुरीचे ६८.५० रुपये प्रतिकिलो अशी निश्चित करण्यात आली.

राष्ट्रीय तेलताड योजनेअंतर्गत सोयाबीनच्या १५ वर्षाच्या आतील वाणास प्रतिकिलो ३४ रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान वजा करून ३४ रुपये प्रतिकिलो किंमत ठरविलेली आहे. यामध्ये एमएयूएस-१५८, एमएयुएस १६२, फुले अग्रणी, एमएसीएस-११८८, जेएस-९५-६० आदी वाणांचा समावेश आहे. परंतु या वाणांची उपलब्धता कमी असल्यामुळे शासनाच्या प्रात्यक्षिक योजनेमध्ये वाटप करण्यात येत आहे.

ग्रामबिजोत्पादन योजनेअंतर्गत सोयाबीनच्या जेएस ३३५ वाणांचा अंतर्भाव असून अनुदान वजा जाता ३० किलो वजनाच्या बॅंगची किंमत १३५० रुपये ठेवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत परमिट देऊन सात-बारा, आधार कार्ड आदी कागदपत्राच्या आधारे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक एकर करिता ३० किलो बियाणे प्राधान्याने देण्यात येणार आहे. उर्वरित बियाणे खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दिले जाईल.

परभणी विभाग पीकनिहाय बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये)
पीक बियाणे
सोयाबीन १०४२५८
तूर १५३९
मूग ११७४
उडीद ४६६७
ज्वारी २१८५
बाजरी २३७
मका ३०५
तीळ २२
सूर्यफूल ५.५२

सद्यःस्थितीत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस होऊन जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी. - एस. पी. गायकवाड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT